बाजाराच्या चढ-उतारात MidCap Stocks देतील दमदार परतावा; 60% पर्यंत परताव्यासाठी यादी तपासा
ET Marathi November 06, 2025 05:45 PM
सध्या जागतिक बाजारात दिसणारी अस्थिरता ही मुख्यत्वे अमेरिकेतील AI संबंधित शेअर्सच्या मूल्यमापनातील घसरणीमुळे आहे. जर जागतिक बाजार अजून खाली गेले, तर भारतीय बाजारही थोडे घसरेल (correction), पण ही घसरण भारतीय कंपन्यांच्या कमाईवर थेट परिणाम करणारी नाही.



उदाहरणार्थ, एखाद्या हॉस्पिटल किंवा ऑटो कंपनीच्या नफ्यावर अमेरिकेतील AI शेअर्स घसरले तरी फरक पडत नाही. त्यामुळे जागतिक बाजार स्थिर झाला की, भारतीय बाजार पुन्हा उभारी घेण्याची शक्यता जास्त आहे.



अलीकडील तेजीच्या टप्प्यात mid-cap शेअर्सचा मोठा सहभाग दिसला आहे आणि बाजाराचा मूडही सकारात्मक आहे, त्यामुळे हे mid-cap शेअर्स अजून काही काळ लक्षात राहू शकतात. आता मुख्य लक्ष द्यायचे ते म्हणजे दुसऱ्या तिमाहीचे Q2 निकाल होय. हे निकाल कंपन्यांच्या आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या स्थितीचे स्पष्ट चित्र दाखवतील. पण निकाल पाहताना, सणासुदीमुळे वाढलेली विक्री आणि जीएसटी कपातीमुळे आलेली वाढ ही तात्पुरती आहे का, हे ओळखणे महत्त्वाचे आहे.



पण लक्षात ठेवा, जर large-cap शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री झाली, तर mid-cap शेअर्सवर त्याचा जास्त परिणाम होऊन तेही खाली येऊ शकतात.



Refinitiv द्वारे प्रकाशित Stock Report Plus मध्ये ET Screener ने अशा काही मोठ्या कंपन्यांची यादी दिली आहे ज्यांना 'बाय' किंवा 'स्ट्राँग बाय' शिफारसी मिळालेल्या आहेत आणि पुढील 12 महिन्यांत 57% पेक्षा जास्त वाढीची शक्यता आहे. या कंपन्या त्यांच्या मजबूत ब्रँड, मोठ्या व्यवसाय किंवा इतर सकारात्मक कारणांमुळे लक्ष वेधून घेत आहेत.



गुंतवणुकीसाठी मिडकॅप शेअर्सची यादी
कंपनीचे नाव रेटिंग संभाव्य वाढ बा.भांडवल (कोटी)
MedPlus Health Services Ltd Strong Buy 37% 9,700
Va Tech Wabag Ltd Strong Buy 35% 8,722
Aether Industries Ltd Buy 33% 10,035
Emami Ltd Buy 32% 23,462
Jubilant Ingrevia Ltd Buy 32% 10,982
Birla Corporation Ltd Strong Buy 31% 9,221
Great Eastern Shipping Company Ltd Strong Buy 31% 15,059
Ratnamani Metals and Tubes Ltd Buy 31% 17,108
Kirloskar Ferrous Industries Ltd Strong Buy 31% 8,318
Gokaldas Exports Ltd Buy 30% 6,318
Triveni Engineering and Industries Ltd Buy 30% 7,840
Mishra Dhatu Nigam Ltd Strong Buy 29% 7,123
G R Infraprojects Ltd Buy 29% 11,124
Dodla Dairy Ltd Strong Buy 29% 7,503
Ramkrishna Forgings Ltd Buy 28% 9,657
Atul Ltd Buy 28% 17,343
Sudarshan Chemical Industries Ltd Buy 27% 9,125




तक्ता : ETMarkets.com | स्त्रोत : Stock Report Plus



अपिजय सुरेंद्र पार्क हॉटेल



Apeejay Surrendra Park Hotels Ltd ही कंपनी भारतभर हॉटेल्स आणि आतिथ्य क्षेत्रात कार्यरत आहे.



अरविंद स्मार्टस्पेसेस



Arvind SmartSpaces Ltd ही अहमदाबाद, पुणे आणि बंगळुरू येथे निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प विकसित करणारी रिअल इस्टेट कंपनी आहे. Alcove, Uplands, Citadel, Skylands, Elan असे प्रकल्प तिच्या अंतर्गत आहेत.



स्टायलम इंडस्ट्रीज



Stylam Industries Ltd लॅमिनेट्स आणि सॉलिड सरफेस उत्पादने बनवणारी कंपनी आहे. तिच्या उत्पादनांमध्ये HPL, Specialty Laminates, Acrylic Solid Surfaces आणि Anti-Fingerprint Laminates यांचा समावेश आहे.



एमएम फोर्जिंग



वाहन उद्योगासाठी स्टील फोर्जिंग्ज तयार करणारी कंपनी होय. तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशात तिचे उत्पादन केंद्र आहे. Crankshaft, Axle Beam, Connecting Rods अशी उत्पादने बनवते.



बजाज कंझ्युमर केअर



Bajaj Consumer Care Ltd ही एफएमसीजी क्षेत्रातील कंपनी आहे. कंपनीचे मुख्य उत्पादने – Bajaj Almond Drops Hair Oil, Amla Aloe Vera Oil, Nomarks Cream & Face Wash इत्यादी आहेत



एस.पी.अपेरल्स



S.P. Apparels Lt ही बालकांसाठी निटेड वस्त्रे तयार करणारी निर्यात कंपनी आहे. Crocodile ब्रँडअंतर्गत पुरुषांचे वस्त्रही विकते. तिच्या कारखान्यांची संख्या सुमारे 21 आहे.



NOCIL Ltd.



रबर केमिकल्स निर्मिती करणारी अग्रगण्य कंपनी. तिची उत्पादने टायर उद्योगात वापरली जातात. उत्पादन केंद्रे – ठाणे (महाराष्ट्र) आणि दहेज (गुजरात).



रेप्को होम फायनान्स



Repco Home Finance Ltd ही गृहनिर्माण कर्ज देणारी एनबीएफसी-एचएफसी कंपनी आहे. कंपनी होम लोन, प्लॉट लोन, एनआरआय लोन, Loan Against Property असे कर्ज देते.



टीसीआय एक्स्प्रेस



TCI Express Ltd ही कंपनी कार्गो वितरण आणि ई-कॉमर्स लॉजिस्टिक्स सेवा देणारी कंपनी आहे.



सुला वाइनयार्ड



Sula Vineyards ही भारतातील सर्वात मोठी वाइन उत्पादक कंपनी आहे. Sula, RASA, Dindori, The Source या ब्रँड्सखाली वाइन विक्री करते. नाशिक व बेंगळुरू येथे Wine Tourism रिसॉर्ट्सही चालवते.



(Disclaimer: ब्रोकरेज फर्म /तज्ज्ञांनी दिलेल्या शिफारसी, सूचना, मते आणि सल्ला ही त्यांची स्वतःची आहेत. हे 'इकॉनॉमिक टाइम्स मराठी'च्या मतांचे प्रतिनिधित्व करत नाहीत.)
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.