PhysicsWallah IPO चा किंमतपट्टा निश्चित ; या असतील महत्वाच्या तारखा, तुम्ही गुंतवणूक करावी का?

भारतातील आघाडीची एज्युकेशन टेक्नॉलॉजी (EdTech) कंपनी फिजिक्सवाला लवकरच शेअर बाजारात आपला आयपीओ घेऊन येत आहे. कंपनीने या आयपीओसाठी प्रति शेअर 103 ते 109 रुपये अशी किंमत निश्चित केली आहे. या पब्लिक ऑफरिंगद्वारे कंपनीचे मूल्यांकन अंदाजे 28,073 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. वेस्टब्रिज आणि हॉर्नबिल कॅपिटल (Hornbill Capital) सारख्या बड्या गुंतवणूकदारांचा फिजिक्सवालाला पाठिंबा आहे. आयपीओची तारीख आणि लिस्टिंगफिजिक्सवालाचा आयपीओ 11 नोव्हेंबर पासून सामान्य गुंतवणूकदारांसाठी खुला होईल आणि तो तीन दिवस म्हणजेच 13 नोव्हेंबर पर्यंत खुला राहिल. यापूर्वी, 10 नोव्हेंबर रोजी मोठे गुंतवणूकदार आपले प्रस्ताव सादर करू शकतील. कंपनीचे शेअर्स 18 नोव्हेंबर रोजी भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध होतील.
निधी उभारणी आणि संस्थापक शेअर्सची विक्रीया आयपीओमधून फिजिक्सवाला एकूण 3,480 कोटी रुपये निधी उभारणार आहे. यात नवीन शेअर्सच्या विक्रीतून सुमारे 3,100 कोटी रुपये येतील. याशिवाय, कंपनीचे सह-संस्थापक अलख पांडे आणि प्रतीक बूब हे Offer For Sale अंतर्गत स्वतःचे 380 कोटी रुपये किमतीचे शेअर्स विकणार आहेत. त्यांनी सुरुवातीला 720 कोटी रुपये किमतीचे शेअर्स विकण्याची योजना आखली होती, पण त्यात आता बदल करण्यात आला आहे. EdTech मधील मजबूत स्थितीगेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये फिजिक्सवालाचे मूल्यांकन 24,609.2 कोटी होते. अनअकॅडमी (Unacademy), वेदांतु (Vedantu) आणि एकेकाळी 1,93,358 कोटी मूल्यांकन असलेली बायजूज (Byju's) यांसारख्या इतर एज्युटेक कंपन्यांना सध्या कर्मचारी कपात आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा कठीण परिस्थितीतही फिजिक्सवालाने आपले स्थान टिकवून ठेवले आहे.
कंपनीचे कामकाजPhysicsWallah चं विशिष्ठ व्यवसाय मॉडेल त्याला ऑनलाइन जमान्यात खास बनवतं. ते ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर कमी खर्चात जास्त लोकांपर्यंत पोहोचतात आणि त्यासोबत काही प्रीमियम ऑफलाइन कोचिंग सेंटरही चालवतात. हे मिश्र मॉडेल आणि मजबूत ऑर्गेनिक मार्केटिंग यामुळे ग्राहक मिळवण्याचा खर्च कमी राहतो आणि वापरकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढते. कंपनीच्या मुख्य YouTube चॅनेलवर 13.7 दशलक्ष सबस्क्रायबर्स आहेत आणि त्यांच्या अॅपला 64 दशलक्षाहून अधिक डाउनलोड मिळाले आहेत. कंपनी 109 शहरांमध्ये भारत आणि मध्य पूर्वेत कार्यरत आहे