Electric Bike : या सर्वात स्वस्त बाईक, स्टायलिश लुकसह दमदार बॅटरीचा पर्याय, किंमत ऐकून हरकून जाल
Tv9 Marathi November 07, 2025 08:45 PM

वाहनधारक हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. इलेक्ट्रिक कार आणि इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. आता बाजारात इलेक्ट्रिक बाईकही उतरल्या आहेत. त्याच्याकडे पण लोकांचा ओढा आहे. येत्या काही दिवसात इलेक्ट्रिक बाईकचे बाजारपेठ मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तुम्ही ईव्ही बाईक खरेदी करण्याच्या विचारात असाल तर स्वस्तातील हे पर्याय तुमच्या समोर आहेत. स्टायलिश लूक आणि दमदार बॅटरीसह या बाईक तुम्हाला भुरळ घालतील.

Ola Roadster X

किफायतशीर इलेक्ट्रिक बाईक खरेदी करणाऱ्यांसाठी Ola Roadster X चांगला पर्याय आहे. या बाईकची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 99,999 रुपये आहे. या बाईकमध्ये 2.5kWh बॅटरी आहे. बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यावर 140 किमीपर्यंत ती धावते. या बाईकची टॉप स्पीड 105 किमी प्रति तास आहे.

Revolt RV1

Revolt RV1 हा स्वस्त बाईकपैकी अजून एक पर्याय आहे. या इलेक्ट्रिक बाईकची एक्स शोरूम किंमत 94,990 रुपये आहे. या बाईकमध्ये 2.2kWh बॅटरी आहे. ही बाईक एकदा चार्ज झाल्यावर 100 किमीपर्यंतचा पल्ला गाठते. या बाईकचा सर्वाधिक वेग 70 किमी प्रति तास आहे.

Oben Rorr EZ

Oben Rorr EZ हा पण किफायतशीर इलेक्ट्रिक बाईक म्हणून ओळखली जाते. या बाईकचीएक्स शोरूम किंमत 99,999 रुपये इतकी आहे. या बाईकमध्ये 2.6kWh बॅटरी देण्यात आली आहे. ही बाईक एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर 110 किमीपर्यंत धावते. या बाईकचा टॉप स्पीड 95 किमी प्रति तास आहे.

Matter Aera 5000

Matter Aera 5000 हा बाईक प्रेमींसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. या इलेक्ट्रिक बाईकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 1.81 लाख रुपये आहे. ही बाईक फुल चार्जमध्ये 172 किमीपर्यंत धावते. या बाईकची टॉप स्पीड 105 किमी प्रति तास इतका आहे.

Ultraviolette F77 SuperStreet

Ultraviolette F77 SuperStreet ही इलेक्ट्रिक बाईक पण चर्चेत आहे. पण ही बाईक खरेदी करण्यासाठी खिशाला ताण पडेल. या बाईकची एक्स शोरूम किंमत 2.99 लाख रुपये आहे. एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर ही बाईक 211 किलोमीटरपर्यंत धावते. ही बाईक 155 किलोमीटर ताशी वेगाने धावते,

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.