टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळत आहे. टीम इंडिया या सीरिजनंतर मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. बीसीसीआय निवड समितीने बुधवारी 5 नोव्हेंबरला या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनने रणजी ट्रॉफी 2025 स्पर्धेतील मुंबईच्या चौथ्या सामन्यासाठी संघाची घोषणा केली. या स्पर्धेत ऑलराउंडर शार्दूल ठाकुर मुंबईचं नेतृत्व करत आहे. निवड समितीने या सामन्यासाठी संघात ओपनरचा समावेश केला आहे.
मुंबई या स्पर्धेतील आपला चौथा सामना हा हिमाचल प्रदेश विरुद्ध खेळणार आहे. हा सामना 8 ते 11 नोव्हेंबर दरम्यान मुंबईतील बीकेसीमधील शरद पवार क्रिकेट अकादमीत होणार आहे. या सामन्यासाठी संघात युवा सलामीवीर आयुष म्हात्रे याचा समावेश करण्यात आला आहे. आयुषला यशस्वी जैस्वाल याच्या जागी संधी देण्यात आली आहे. यशस्वीची मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे यशस्वीला मुंबई संघातून मुक्त करण्यात आलंय. त्यामुळे आयुषला संधी मिळाली.
यशस्वीने तिसर्या सामन्या राजस्थान विरुद्ध बॅटिंगने अप्रतिम कामगिरी केली. मुंबई विरुद्ध राजस्थान सामना अनिर्णित राहिला. मात्र यशस्वीने आपली छाप सोडली. यशस्वीने सामन्यातील पहिल्या डावात 67 धावा केल्या. तर मुंबईच्या ओपनरने दुसऱ्या डावात दीडशतकी खेळी केली. यशस्वीने राजस्थान विरुद्ध दुसर्या डावात 156 रन्स केल्या. त्यामुळे यशस्वीकडून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणखी मोठ्या खेळीची आशा असणार आहे.
आयुषने दक्षिण आफ्रिका ए विरूद्धच्या सामन्यात इंडिया ए टीमकडून खेळताना पहिल्या अनऑफिशियल टेस्ट मॅचमध्ये अर्धशतक केलं होतं. आयुषने पहिल्या डावात 76 बॉलमध्ये 65 रन्स केल्या होत्या. तर आयुष दुसऱ्या डावात अवघ्या 6 धावांवर बाद झाला.
दरम्यान मुंबईने रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात 3 पैकी 1 सामना जिंकला आहे. तर 2 सामने अनिर्णित सोडवण्यात यश मिळवलं आहे. भारताने जम्मू-काश्मीरवर विजय मिळवला. तर छत्तीसगड आणि राजस्थान विरुद्धचा सामना ड्रॉ राहिला.
यशस्वीची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड
शार्दुल ठाकुर (कर्णधार), आयुष म्हात्रे, आकाश आनंद (विकेटकीपर), अजिंक्य रहाणे, सिद्धेश लाड, सर्फराज खान, मुशीर खान, आकाश पारकर, शम्स मुलानी, तुषार देशपांडे, सिल्वेस्टर डिसोझा, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), इरफान उमेर, अखिल हेरवाडकर, हिमांशु सिंह, कार्तिक मिश्रा आणि साईराज पाटील.