टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील आणि टी 20i मालिकेतील पाचवा तसेच अंतिम सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका 2-1 ने जिंकली. त्यानंतर आता टीम इंडिया 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. उभयसंघात टी 20i मालिकेतील पहिला सामना हा पावसामुळे रद्द करावा लागला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने मालिकेतील दुसरा सामना जिंकत पहिला विजय मिळवला. मात्र त्यानंतर भारताने सलग 2 सामने जिंकत मालिकेत जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे आता भारताकडे सलग आणि एकूण तिसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्यासह वनडे सीरिजमधील पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे.
सूर्यकुमार यादव या अंतिम सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर मिचेल मार्श याच्याकडे ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वाची धुरा आहे. उभयसंघातील पाचवा आणि अंतिम सामना टीव्ही आणि मोबईलवर कुठे पाहायला मिळेल? हे जाणून घेऊयात.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पाचवा टी 20i सामना केव्हा?ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पाचवा टी 20i सामना शनिवारी 8 नोव्हेंबरला होणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पाचवा टी 20i सामना कुठे?ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पाचवा टी 20i सामना ब्रिस्बेनमधील ‘द गाबा’ इथे होणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पाचवा टी 20i सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पाचवा टी 20i सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी टॉस होईल. तर त्याआधी 1 वाजून 15 मिनिटांनी नाणेफेकीचा कौल लागेल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पाचवा टी 20i सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पाचवा टी 20i सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पाचवा टी 20i सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पाचवा टी 20i सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.