पर्यटन हा तसा सर्वांच्याच आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. आपण अनेकदा ट्रिप प्लॅन करतो मात्र महागाई, ट्रेन, विमानाची तिकिटं आणि तिथे राहण्याचा खर्च लक्षात घेऊन नंतर ही ट्रिप रद्द देखील करतो. परदेशात फिरण्यासाठी जायचं हे आपलं स्वप्न असतं. मात्र परदेशातील पर्यटन स्थळांना भेट देणं हे तुलनेनं देशातील पर्यटन स्थळाला भेट देण्यापेक्षा खूप महागडे असते ते आपल्या खिशाला परवडणारं नसते. समजा आपण अमेरिकेची ट्रिप प्लॅन केली तर आपल्याला या ट्रिपसाठी प्रचंड खर्च येऊ शकतो कारण अमेरिकेच्या एका डॉलरची किंमत ही जवळपास 85 भारतीय रुपये आहे.
मात्र आज आपण अशा काही देशांची माहिती घेणार आहोत जे देश खूप सुंदर आहेत. या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटन स्थळे आहेत. आणि या देशांमध्ये ज्या चलनाचा वापर होतो त्याची किंमत भारतीय रुपयांच्या तुलनेत कमी आहे, त्यामुळे कमी बजेटमध्ये सुद्धा तुम्हाला परदेशवारी करता येऊ शकतो.
ज्यामध्ये पहिला देश आहे तो म्हणजे नेपाळ नेपाळमध्ये भारताच्या शंभर रुपयांची किंमत 160 रुपये होते, त्यामुळे हा देश फिरणं स्वस्त आहे. नेपाळमध्ये अनेक ऐतिहासिक पर्यटनस्थळं आहेत.
यामधील दुसरा देश आहे तो म्हणजे कंबोडिया, कंबोडिया देखील जागतील एक सुंदर देश आहे. कंबोडियाची संस्कृती हा विशेष आकर्षणाचा विषय आहे. येथे भारताच्या एका रुपयाची किंमत तब्बल 50 कंबोडियन रियाल एवढी आहे, त्यामुळे तुम्ही अगदी कमी बजेटमध्ये आरामात कंबोडियाची ट्रीप करू शकता.
तिसरा देश आहे व्हिएतनाम – व्हिएतनाम हा देशा पर्यटकांच्या आकर्षणाच केंद्रबिंदू आहे. व्हिएतनाम ट्रिप तुम्ही अगदी कमी खर्चात करू शकता. कारण इथे भारताच्या एक रुपयाची किंमत तब्बल 300 रुपये एवढी होते, त्यामुळे तुम्ही अगदी कमी बजेटमध्ये संपूर्ण व्हिएतनाम फिरू शकता. हा देश तसा खूपच स्वस्त आहे. या देशात राहण्याची आणि खाण्याची उत्तम सोय आणि ते देखील कमी खर्चात पूर्ण होऊ शकते. तुम्ही कमी बजेटमध्ये व्हिएतनामला भेट देऊन तुमच्या परदेशवारीचं स्वप्न पूर्ण करू शकता.