Devmanus: 'मी संपणाऱ्यातील नाहीये…'; माधुरीला कोणी मारलं? 'देवमाणूस'मध्ये धक्कादायक ट्विस्ट
Saam TV November 08, 2025 01:45 PM

Devmanus: लोकप्रिय टीव्ही मालिकेत एक मोठा धक्का देणारा ट्विस्ट येऊ घातलेला आहे. झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या मालिकेत ‘देवमाणूस’मधील माधुरीच्या खुनात आता एक तिसरी व्यक्ती समोर येण्याची शक्यता वाढली आहे.

प्रोमोमध्ये दिसते की, जिथे माधुरीचा मृतदेह पुरलेला असतो, तिथे एक हातात बांगड्या घातलेली स्त्री जमिनीतून बॅग काढताना दिसते. त्या बॅगमधून पैसे बाहेर काढताना ती म्हणते, “मी संपणाऱ्यातील नाहीये, पुरून उरणारी आहे.” या दृश्याने प्रेक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे कारण याआधी खुनाच्या आरोपांमध्ये मुख्य आरोपी म्हणून गोपाळ किंवा हिम्मतराव यांची नावे आल्या होती.

Famous Singer Concert: मुंबईत प्रसिद्ध गायकाच्या कॉन्सर्टमध्ये चोरट्यांचा डल्ला, २३ लाखांचे मोबाईल लंपास

प्रोमोमध्ये या ट्विस्टचा भाग दाखवला गेला आहे, त्यात गोपाळने आप्पाला विचारले: “पैशांसाठी माधुरीला मारलं ना?” त्यावर आप्पा म्हणतो, “मी नाही, तुझं पाप माझ्या माथी मारू नकोस.” हे संवाद देखील खुनाच्या मागील वास्तवावर संशय वाढवतात.

Hema Malini: 'ते ठीक आहेत...'; हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल दिली अपडेट, हात जोडून मानले आभार, व्हिडिओ व्हायरल
View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

नेटिझन्सनी या प्रोमोवर मोठ्या उत्सुकतेने प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी अभिनेत्री अस्मिता देशमुख यांचं नाव घेतलं 'ती या गुप्त स्त्रीची भूमिका साकारणार असेल' असं लिहीलं, तर काहींनी ‘लाली’ किंवा ‘डिंपल’ अशा पात्रांची नावे चर्चा केली आहेत. या ट्विस्टमुळे मालिकेचा ओघ बदलण्याची शक्यता आहे खुन करणारी कोण? खुनाचा हेतू पैशांसाठी का होता? आणि गोपाळच्या सत्याची उकल होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढील भागात मिळणार आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.