Axis Securities ने गुंतवणुकीसाठी सुचवले 5 स्मॉलकॅप शेअर्स; 35% पर्यंत वाढीची शक्यता
ET Marathi November 09, 2025 02:45 PM
देशातील वाढत्या औद्योगिक आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांवर भर देत Axis Securities ने नोव्हेंबर महिन्यासाठी पाच आकर्षक स्मॉलकॅप शेअर्सची यादी जाहीर केली आहे. या कंपन्यांच्या मजबूत बॅलन्स शीट, स्थिर नफा वाढ आणि ठोस ऑर्डर बुकच्या आधारावर ब्रोकरेजनं या शेअर्समध्ये 13% ते 35% पर्यंत वाढीची शक्यता व्यक्त केली आहे. या कंपन्या प्रामुख्याने स्वच्छ ऊर्जा, औद्योगिक विस्तार आणि घटक उत्पादन या देशांतर्गत विकास विषयांशी निगडित आहेत.



Axis Securities – नोव्हेंबरसाठी निवडलेले स्मॉलकॅप शेअर्स
कंपनीचे नाव सध्याची किंमत (₹) लक्ष्य किंमत (₹) वाढीची शक्यता
Mahanagar Gas Ltd 1,216 1,540 27%
Inox Wind Ltd 149 190 27.50%
Kirloskar Brothers Ltd 1,719 2,330 35.50%
Sansera Engineering Ltd 1,519 1,720 13.20%
Kalpataru Projects International Ltd 1,294 1,475 14%
कंपन्यांबाबत माहितीयुटिलिटीज (गॅस) क्षेत्रातील Mahanagar Gas Ltd बद्दल Axis Securities म्हणते की कंपनीच्या वाढत्या capex गुंतवणुकीमुळे आणि नवीन गॅस क्षेत्रांत विस्तारामुळे भविष्यात विक्रीत वाढ अपेक्षित आहे.



युटिलिटीज (पवन ऊर्जा) क्षेत्रातील Inox Wind Ltd सध्या पवन ऊर्जा क्षेत्रात मजबूत स्थितीत असून 2,200 कोटींच्या बँकिंग सुविधांमुळे आर्थिक लवचिकता वाढली आहे.



औद्योगिक यंत्रसामृग्री बनवणाऱ्या Kirloskar Brothers Ltd साठी ब्रोकरेजनं सर्वाधिक 35.5% वाढीची शक्यता दर्शवली आहे. कंपनीचा मोठा ऑर्डर बुक आणि सतत वाढणारी मागणी तिच्या महसुलात स्थिर वाढ घडवून आणू शकते.



Sansera Engineering Ltd ही कंपनी ऑटोमोबाईल आणि नॉन-ऑटो क्षेत्रात काम करते. प्रीमियमायझेशन ट्रेंड आणि नव्या उत्पादनांमुळे तिच्या महसूल व नफ्यात दहापट वाढ होण्याची अपेक्षा आहे.



Kalpataru Projects International Ltd ही कंपनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय इन्फ्रास्ट्रक्चर व पॉवर ट्रान्समिशन क्षेत्रात सक्रिय आहे. मजबूत ऑर्डर बुक आणि सरकारी प्रकल्पांच्या पाठबळामुळे तिच्या नफ्यात सुधारणा अपेक्षित आहे.



(Disclaimer: ब्रोकरेज फर्म /तज्ज्ञांनी दिलेल्या शिफारसी, सूचना, मते आणि सल्ला ही त्यांची स्वतःची आहेत. हे 'इकॉनॉमिक टाइम्स मराठी'च्या मतांचे प्रतिनिधित्व करत नाहीत.)
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.