सोलापूर : बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित ‘जल्लोष लोककलेचा’ या कार्यक्रमांतर्गत सोलापूरमधील बालकलाकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. समूह नृत्य, एकल नृत्य, समूह गायन, एकल गायन आणि वाद्य वादन यासारख्या विविध कलाप्रकारांच्या स्पर्धेत जिल्ह्यातील २५० बालकलावंतांनी सहभाग घेतला. समूह नृत्य स्पर्धेत मेहता प्रशाला, तर समूह गायन मध्ये संगमेश्वर पब्लिक स्कूल प्रथम क्रमांक मिळविला.
Leopard Attack: होत्या गाई म्हणून वाचल्या बाई ! 'टाकळी हाजी येथे बिबट्याचा महिलेवर हल्ला'; गायीच्या प्रतिहल्ल्याने वाचला जीव..हरिभाई देवकरण प्रशालेच्यामुळे सभागृहात मान्यवरांच्या उपस्थित बक्षीस वितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमासाठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार आणि बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा सीमा यलगुलवार, उपाध्यक्ष गोवर्धन कमटम, प्रमुख कार्यवाह अर्चना अडसूळ, कार्यकारिणी सदस्य प्रा. ज्योतिबा काटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून सुभाष शास्त्री, ऋषिकेश बदामीकर, डॉ. श्रीपाद कुडक्याल आणि मनोज अधटराव यांनी चोख कामगिरी बजावली. बक्षीस वितरणप्रसंगी परीक्षक आणि उपस्थित पालकांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सल्लागार सदस्य प्रशांत देशपांडे, सहकार्यवाह संजय सावंत, मच्छिंद्र सपताळे, निमंत्रित सदस्य हिरालाल धुळम आणि सुभाष माने यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन असलम मुलानी, उपाध्यक्ष खंडू शिंदे आणि सचिन चौधरी यांनी केले. अर्चना अडसूळ यांनी आभार मानले. या समारंभाला मंगळवेढा, पंढरपूर, बार्शी, सोलापूर या ठिकाणच्या स्पर्धकासह पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
MPSC Success Story:'संसारी स्नेहलची अधिकारीपदाला गवसणी'; पिंपोडे बुद्रुकच्या लेकीचं ‘क्लास वन’ यश; संघर्षातून साकारलं स्वप्न.. स्पर्धेतील विजेते व मानकरीएकल नृत्य : (प्रथम) स्पृहा भोसले, अनवी टोणपे. (द्वितीय) कार्तिकी उराडे, भार्गवी बोडा. (तृतीय) स्नेहा कांबळे.
समूह नृत्य : (प्रथम) व्ही.एम. मेहता प्रशाला, सोलापूर एस .पी.एम इंग्लिश स्कूल. (द्वितीय) श्री मल्लिकार्जुन हायस्कूल सोलापूर, जिजामाता प्रशाला कोंडी. (तृतीय) इंग्लिश स्कूल मंगळवेढा,
समूह गायन : (प्रथम) संगमेश्वर पब्लिक स्कूल, इंग्लिश स्कूल बेगमपूर.(द्वितीय) मेहता स्कूल मॉडर्न हायस्कूल. (तृतीय) भारती विद्यापीठ,
एकल गायन : (प्रथम) जोसेफिया मुर्शिद, ऋतुराज कुलकर्णी. (द्वितीय) रिया शाकीर, अभयसिंह जाधव. (तृतीय) काशिनाथ भालेराव,
वाद्य वादन : (प्रथम) पुरुषोत्तम कुलकर्णी, वेदांत कोरे. (द्वितीय) शिवराज भगरे, यशराज शिंदे. (तृतीय) राजवीर कोंडूभैरी.