मध्यरात्री गोविंदाची तब्येत बिघडली तेव्हा पत्नी किंवा मुलांना नाही तर या मित्राला सर्वात आधी फोन केला
Tv9 Marathi November 13, 2025 03:45 PM

मुंबईत दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अचानक बेशुद्ध पडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण त्यानंतर त्याने त्याची प्रकृती सुधारल्याचं सांगत एक व्हॉइस मेसेज शेअर केला. त्यात अभिनेत्याने सांगितले की त्याची प्रकृती सुधारत आहे. “खूप खूप धन्यवाद… मी ठीक आहे,” असही तो म्हणाला. अभिनेतागोविंदानेत्याच्या आरोग्याची माहिती शेअर केल्याने चाहत्यांचा जीवही भांड्यात पडला. गोविंदाला जुहू येथील क्रिटिकल केअर एशिया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

गेल्या 3 के 4 दिवसांत गोविंदाने खूप जास्त व्यायाम केला होता

गोविंदाचे मित्र आणि कायदेशीर सल्लागार ललित बिंदल यांच्या माहितीनुसार, गेल्या 3 के 4 दिवसांत गोविंदाने खूप जास्त व्यायाम केला होता, ज्यामुळे त्याला खूप थकवा जाणवू लागला आणि तो बेशुद्ध पडला. जेव्हा बॉलिवूड अभिनेता गोविंदाला रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हा त्यांचे वकील आणि मित्र ललित बिंदल यांनी मध्यरात्री गोविंदासोबत काय घडले आणि त्यांनी प्रथम कोणाला फोन केला होता याचा खुलासा केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Govinda (@govinda_herono1)


गोविंदाने सगळ्यात आधी कोणाला फोन केला?

ललित म्हणाले की, गोविंदानेसगळ्यात आधी कोणाला फोन केला असेल तर ते त्यांचे मित्र ललितच होते. बिघडत्या तब्येतीची माहिती देण्यासाठी गोविंदाने फोन केला होता, त्यानंतर ते त्यांना रुग्णालयात घेऊन गेले. ललित यांनी असेही सांगितले की, गोविंदाला मंगळवार सकाळपासून खूप अशक्त आणि अस्वस्थ वाटत होते. ललित म्हणाले, “काल त्यांना अशक्तपणा जाणवत होता आणि ते बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात आले.

गोविंदाला मंगळवारी रात्री 8.30 ते 9.00 च्या दरम्यान त्याला थोडासा त्रास होत नसल्याने त्यांच्या फॅमिली डॉक्टरांनी जी ओषध लिहून दिलं होतं ते औषध घेतलं. त्यानंतर तो विश्रांतीसाठी त्याच्या खोलीत गेला. पण अचानक, रात्री 12 वाजता, त्याला अस्वस्थ, अशक्त आणि गुदमरल्यासारखे वाटू लागल्याची माहिती ललित यांनी दिली आहे.

गोविंदाची तब्येत कशी आहे?

ललित पुढे म्हणाले “गोविंदांनी मला पुन्हा फोन केला आणि त्यांच्या घरी येण्यास सांगितले. मी 12.15 च्या सुमारास त्यांच्या घरी पोहोचलो. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर, मी त्यांना रुग्णालयात घेऊन गेलो. त्यांना प्रथम आपत्कालीन वॉर्डमध्ये नेण्यात आले. तपासणीनंतर, त्यांना पहाटे 1 वाजता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर गोविंदाला आता आपत्कालीन वॉर्डमधून एका खोलीत हलवण्यात आले असून त्याची प्रकृती चांगली आहे आणि त्याला डिस्चार्जही मिळाला आहे.”

गोविंदा आजारी का पडला?

गोविंदाचे वकील आणि जवळचे मित्र ललित बिंदल यांनी सांगितले की, अभिनेत्याच्या चाचणी निकालांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिला. सर्व रिपोर्टही नॉर्मल आले होते. दगदग आणि जास्त व्यायाम त्यामुळे तो बेशुद्ध पडला असावा. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या धावपळीच्या वेळापत्रकामुळेही तो फार अस्वस्थ वाटत होता. डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा आणि चांगला आहार घेण्याचा सल्ला दिला आहे. तो घरी आहे आणि त्याची तब्येत ठीक आहे. त्याने त्याच्या चाहत्यांच्या शुभेच्छांसाठी त्यांचे आभार मानले.

.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.