Rose Benefits : गुलाब अनेक आजारांवर प्रभावी औषध, वाचा चमत्कारीक फायदे
Marathi November 13, 2025 05:25 PM

प्रेमाचे प्रतीक असणारे गुलाब आजपर्यंत अनेक प्रेमकहाणीचा साक्षीदार झाला आहे. गुलाबाचे फूल ही प्रेमाची निशाणी म्हणून ओळखले जाते. गुलाबाचे फूल विविध रंगामध्ये पाहिल्यावर मन अगदी प्रसन्न होते. फुलांचा राजा अशी ओळख असणारे गुलाब केवळ सौंदर्यासाठीच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे आरोग्याच्या विविध समस्यांवर गुलाबाचा वापर करता येईल. आज आपण जाणून घेऊयात गुलाब आरोग्यासाठी कसे फायदेशीर असते.

  • गुलाबाच्या पाकळ्यांतील घटक शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास आणि चयापचय वाढवण्यास फायदेशीर असतात. ज्यामुळे लठ्ठपणा कमी होतो.
  • वारंवार भूक लागत असेल तर गुलाबाच्या पाकळ्या खाव्यात. यामुळे भूक नियंत्रणात राहते आणि वजन वाढत नाही.
  • मुळव्याध्यावर गुलाबाच्या पाकळ्या उपयुक्त आहेत. यातील फायबर आणि पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात आणि पचन सुधारतात.

हेही वाचा – Winter Indoor Workout Ideas: कडाक्याच्या थंडीत व्यायामाचा कंटाळा येतो? जाणून घ्या काही इनडोअर वर्कआऊट

  • गुलाबामधील व्हिटॅमिन सी आणि ऍटी-ऑक्सिडंट्स हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त असतात. तुम्ही हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी गुलकंद स्वरूपात गुलाबाचे सेवन करू शकता.
  • गुलाबाच्या फुलातील ऍटी-ऑक्सिडंट्स गुणधर्म मुरूम कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे सौंदर्यासाठी गुलाबाचा फायदा होतो.
  • गुलाबाच्या पानांची वाफ घेतल्याने मन शांत होते. यात ताण कमी करणारे अनेक घटक असतात.
  • गुलाबाच्या पाकळ्यातील व्हिटॅमिन सी शरीराला विविध संसर्गांपासून वाचवते.
  • प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाब देतातच. पण गुलाब व्यक्तीला लैंगिकदृष्ट्या सक्रिय बनवतो. गुलाबाकडे पाहून मूड सुधारतो आणि रोमान्सची इच्छा दुप्पट होते. त्यामुळे लैंगिक उत्तेजना वाढवण्यासाठी गुलाब फायदेशीर आहे.

त्यामुळे गुलाबाकडे केवळ प्रेमाचे प्रतीक म्हणूनन पाहता त्याचे आरोग्यादायी फायदे लक्षात घेऊन दैनंदिन जीवनात त्याचा वापर करावा.

हेही वाचा – Acidity : सतत ऍसिडीटी? लाइफस्टाईलमध्ये करा हा बदल

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.