Retail Inflation Rate in India : देशातील किरकोळ महागाईचा दर ऑक्टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात घसरून 0.25 टक्क्यांवर आला आहे. या कमी पातळीवरील दर हे आजपर्यंतचे सर्वात कमी दर आहेत. सांख्यिकी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महागाईतील ही घसरण प्रामुख्याने अन्नधान्याच्या किमती कमी झाल्यामुळे आणि वस्तू व सेवा करातील (GST) कपातीमुळे झाली आहे.
Retail Inflation Rate India
सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर 1.54 टक्के होता. ऑगस्टमध्ये थोडी वाढ झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये घट दिसून आली होती. मात्र ऑक्टोबरमध्ये ही घसरण मोठ्या प्रमाणात झाली. मंत्रालयाच्या माहितीनुसार, ही गेल्या दहा महिन्यांतील सर्वात मोठी मासिक घट आहे.
ऑक्टोबर महिन्यात अन्नधान्याच्या महागाईत सर्वाधिक घट झाली आहे. सप्टेंबरच्या तुलनेत दर आणखी खाली आले असून सध्या अन्नधान्य किंमत निर्देशांक सर्वात कमी पातळीवर पोहोचला आहे. ग्रामीण भागात दर घटण्याचे प्रमाण थोडे कमी असले तरी शहरी भागात घट अधिक आहे.
भाज्या, फळे, धान्य, तेल, पादत्राणे, वाहतूक आणि दळणवळण यांसारख्या वस्तूंच्या किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे एकूणच महागाईत घट झाली.
Gold Rate Today : सोन्याचे भाव वाढले; चांदीही चमकली! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव! राज्यानुसार महागाई आकडेसर्वाधिक महागाई
केरळ (8.56 %)
जम्मू-कश्मीर (2.95 %)
कर्नाटक (2.34 %)
सर्वात कमी महागाई
बिहार ( -1.97%)
उत्तर प्रदेश ( -1.71%)
मध्य प्रदेश (-1.62%)
क्षेत्रनिहाय पाहता, गृहनिर्माण क्षेत्रातील महागाई ऑक्टोबरमध्ये 2.96 टक्के नोंदवली गेली, जी सप्टेंबरच्या 2.98 टक्क्यांपेक्षा किंचित कमी आहे. आरोग्य क्षेत्रातील महागाई 4.39 टक्क्यांवरून 3.86 टक्क्यांपर्यंत घटली.
दरम्यान, शिक्षण क्षेत्रातील महागाई थोडी वाढून 3.49 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. वाहतूक आणि दळणवळण क्षेत्रातील महागाई 0.94 टक्क्यांवर घसरली, तर इंधन आणि ऊर्जा क्षेत्रातील दर 1.98 टक्क्यांवर स्थिर राहिले.