Gold Price: सोन्याविषयी सर्वात मोठे भाकीत, तो रेकॉर्डही मोडणार, दीड लाखांचाही टप्पा ओलांडणार? कोण मालामाल होणार?
Tv9 Marathi November 13, 2025 06:45 PM

Gold Rate Cross 1.5 lakh per gram mark : सोने आणि चांदीत तेजीचा हंगाम लवकरच परतणार आहे. जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या दरवाढीला उकळी फुटली आहे. गेल्या तीन आठवड्यांच्या उच्चांकावर दोन्ही धातू आहेत. एका अहवालानुसार, वर्ष
2026 मध्ये सोन्याचा भाव प्रति औस 5,000 डॉलर्सपर्यंत जाऊ शकतो. म्हणजेच, 10 ग्रॅम सोन्याची किंमत वर्ष 2026 मध्ये 1,59,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते. म्हणजे आजपासून सोने पुढील वर्षांपर्यंत 20 टक्के परतावा देऊ शकते. अमेरिकेत सरकारी शटडाऊनचे संकट टळले आहे. तर अमेरिकन फेडरल रिझर्व्ह (US Fed) व्याजदर कपातीची लवकरच घोषणा करू शकते. त्यामुळे गुंतवणूकदार पुन्हा सोन्याकडे वळतील आणि किंमती वाढतील.

वायदे बाजारात काय स्थिती?

जागतिक बाजारात Comex गोल्ड फ्यूचर्स (डिसेंबर डिलिव्हरी) 0.45% वाढून $4,140.75 प्रति औंसवर पोहोचले. सिल्वर फ्यूचर्सही 0.08% वाढून $50.35 प्रति औस वर पोहचले. मुंबईत 24 कॅरेट सोनं 1,23,830 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेट सोनं 1,13,510 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 1,57,100 रुपये प्रति किलोवर पोहचली आहे.

का वाढत आहेत भाव?

Kotak Securities च्या असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट कमोडिटी रिसर्च कनात चैनवाला यांनी सोन्याच्या वाटचालीवर मत मांडले. त्यानुसार, सोमवारी स्पॉट गोल्ड हे 3% वाढले. ते दोन आठवड्यांच्या उच्चांकावर $4,116.7 प्रति औसवर पोहोचले. अमेरिकेतील शटडाऊन संकट संपल्याचा परिणाम दिसला. तर अर्थव्यवस्था मंदावल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपातीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

अमेरिकन फेड हे डिसेंबर महिन्यात 64% व्याजदर कपात तर जानेवारीत 77% पर्यंत कपातीचा अंदाज वर्तवला जात आहे. केंद्रीय आणि मध्यवर्ती बँकांचा सोने खरेदीकडे कल वाढला आहे. गुंतवणूकदारांनी सुद्धा गुंतवणूक वाढवली आहे. चीनच्या मध्यवर्ती बँक (PBOC) सलग 12 व्या महिन्यातही सोने साठा वाढवला. ही सोने खरेदी 74.09 दशलक्ष औंसांपर्यंत पोहोचली आहे. जागतिक मध्यवर्ती बँकांनी तिसऱ्या तिमाहीत (Q3) 220 टन सोन्याची खरेदी केली, जी दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत 28% जास्त आहे. गोल्ड ETF (एक्सचेंज ट्रेडेड फंड्स) मध्येही सलग पाचव्या महिन्यात वाढलेली मागणी नोंदवली गेली. ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक 54.9 टन सोनं खरेदी झाली. येत्या काही दिवसात किंमतीत मोठी उलाढाल दिसणार नाही. सोने स्थिर होईल. पण नंतर सोने भरारी घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. JP Morganच्या मते 2026 मध्ये सोने 5000 डॉलर्स प्रति औसच्या घरात पोहचू शकते.

तर ब्लूमबर्गनुसार 2026 च्या अखेरीस म्हणजे पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत सोन्याच्या किंमती $5,200 ते $5,300 प्रति औसपर्यंत पोहोचू शकतात. म्हणजे सोन्याचा भाव दीड लाखांहून अधिक होईल. सध्याच्या गुंतवणुकीवर ग्राहकांना भविष्यात 20% पेक्षा जास्त परतावा मिळू शकतो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.