महेंद्रसिंह धोनीच्या पथिरानावर विश्वास होता आणि त्याचा सामन्यात पुरेपूर वापर करून घेतला. चेन्नई सुपर किंग्सने मथिशा पथिरानाला मेगा लिलावात रिटेन केलं होतं. त्यासाठी 13 कोटी मोजले होते. पण त्याला आता रिलीज केलं आहे. त्यामुळे मिनी लिलावात त्याच्यासाठी बोली लागणार हे स्पष्ट झालं आहे. (Photo: PTI)
मथिशा पथिरानाला बाहेर करण्याचं कारणंही समोर आलं आहे. चेन्नई सुपर किंग्सचे हेड कोच स्टीफन फ्लेमिंगने त्यासाठी सल्ला दिला होता. फ्लेमिंगने पथिरानाचा प्रभाव आणि फॉर्म नसल्याने चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे त्याला रिलीज करण्याचं कारण फ्रेंचायझीला मिळालं. (Photo: PTI)
आयपीएल 2025 स्पर्धेतील 12 सामन्यात पथिरानाने फक्त 13 विकेट घेतल्या होत्या. त्याचा इकोनॉमी रेट हा 10 धावा प्रति षटकं होता. या काळात त्याची लाईन अँड लेंथही बिघडल्याचं दिसून आलं. त्यामुळे त्याच्यावर टीका झाली होती. (Photo: PTI)
पथिराना अनेकदा दुखापत झाल्याने संघाच्या आत बाहेर असतो. त्यामुळे फ्रेंचायझीला कधी कधी संघात असून नसल्यासारखं असतो. त्यामुळे त्याचा तसा काही उपयोग होताना दिसत नाही. आता त्याला रिलीज केल्याने कोणता संघ त्याच्यासाठी बोली लावतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (IPL Photo)