माणुसकीला लाजवणारी घटना समोर आली आहे. एका 8 वर्षाच्या निष्पाप मुलीला चॉकलेटच आमिष दाखवून 67 वर्षाच्या वृद्धाने त्या चिमुरडीचा विनयभंग केला. पोलिसांनी आरोपीला अटक करुन तुरुंगात पाठवलं आहे. आठ वर्षांची मुलगी दररोज शाळेत जायची. कधी-कधी शाहीद तिला टॉफी चॉकलेट द्यायचा. चिमुकली केजीमध्ये शिकतेय. गुरुवारी संध्याकाळी चार वाजता मुलगी जेव्हा घरी पोहोचली, तेव्हा तिच्याकडे अनेक टॉफी आणि दहा रुपयाची नोट होती. मुलीला तिच्या आईने टॉफी चॉकलेट आणि दहा रुपयाबद्दल विचारलं. त्यावर मुलीने जे सांगितलं ते ऐकून आईला धक्का बसला. आईच्या डोळ्या समोर अंधारी आली. उत्तर प्रदेशच्या बिजनौरमधील हे प्रकरण आहे.
मुलीने आईला सांगितलं की, शाळेत जाताना दाढीवाले काका तिला टॉफी चॉकलेट, बिस्कीटं देतात. तिच्यासोबत घाणेरडं बोलतात. मुलीने हे सर्व सांगितल्यानंतर आईने तिला दाढीवाल्या काकांकडे घेऊन जायला सांगितलं. मुलगी आणि तिची आई शाहिद पर्यंत पोहोचले. दोघांना पाहून शाहिद घाबरला. त्याने चूक मान्य केली. वयाचा दाखला देऊन तो शांत रहायला सांगत होता. पण मुलीच्या आईने विषय उचलून धरला. 121 वर फोन करुन पोलिसांना बोलावलं.
पोलिसांनी काय आरोप लावलेत?
शाहिदला खूप सुनावलं. त्यानंतर पोलीस शाहिदला आपल्यासोबत घेऊन गेले. महिलेने नगीना पोलीस स्टेशनमध्ये शाहिद विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी लिखित तक्रार दिली आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात अत्याचार, अश्लीलता आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवलाय.
अश्लील कृती
महिलेने सांगितलं की, “तिचा पती उत्तराखंडमध्ये नोकरी करतो. नगीना येथे राहून ती मुलांची देखभाल करते. शाळेत यायच्या जायच्या वेळी माझ्या मुलीला टॉफी आणि अन्य खायच्या वस्तू देऊन तिला भुलवायचा. मुलीचं वय आणि निष्पापपणा याचा फायदा उचलून तो अश्लील कृती करायचा”
फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालणार
पोलिसांनी शाहिद विरोधात अत्याचार, अश्लीलता पसरवणं, पॉक्सोच्या कलमातंर्गत गुन्हा नोंदवून हैवानाला अटक केली. त्याची रवानगी तुरुंगात केलीय. या केसचा फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवू असं नगीनाच्या सीओ अंजनी कुमार चतुर्वेदी यांनी सांगितलं. आरोपीला लवकरात लवकर शिक्षा झाली, तर मुलीला न्याय मिळेल.