10 नोव्हेंबर 2025 च्या सायंकाळी मोठा स्फोट दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात झाला. सुरूवातीला हा स्फोट असल्याचे सांगितले गेले. मात्र, याची धागेदोरे विदेशात पोहोचली आणि एकच खळबळ उडाली. चक्क काही डॉक्टरांचा समावेश या स्फोटात असल्याचे पुढे आले. i-20 गाडीत स्फोटके भरली होती आणि मोठा घातपात करण्याचा दहशतवाद्यांचा प्लॅन होता. मात्र, घाईगडीत लाल किल्ल्याजवळ भर रस्त्यामध्ये हा स्फोट झाला. पुलवामातील दहशतवादी उमर गाडीत होता आणि त्यानेच हा स्फोट घडवला. ज्यावेळी स्फोट झाला, त्यावेळी उमर हा स्वत: गाडीत होता. त्याच्या कुटुंबियांशी त्याचा DNA 100 टक्के जुळला. गेल्या काही दिवसांपासून या हल्ल्याचे प्लॅनिंग सुरू होते. महिला डॉक्टर शाहीन सईद थेट दहशतवाद्यांचा संपर्कात होती. हेच नाही तर उमर कट्टरपंथी बनल्याची कल्पना त्याच्या कुटुंबियांना होती. मात्र, त्यांनी याची माहिती यंत्रणांना दिली नाही.
या हल्ल्यानंतर आर्मीने चक्क उमरचे पुलवामातील घर उडवून दिले आणि त्याच्या कुटुंबियांची कसून चाैकशी सुरू आहे. 20 पेक्षा अधिक लोक या हल्ल्यात गंभीर जखमी झाले तर 9 जणांचा जीव गेला. भारताने स्पष्ट केले की, हा बॉम्बस्फोट आहे. असूनही चाैकशी सुरू आहे. यादरम्यान अनेक देश भारतासाठी मैदानात आल्याचे बघायला मिळाले. जवळपास 15 देशांनी भारताचे समर्थन करत बाजू घेतली. ज्यामध्ये अमेरिका आणि चीनचा देखील समावेश आहे.
चीन, अमेरिका, कॅनडा, मलेशिया, इस्रायल, मिस्त्र, नेपाळ, जपान, अफगाणिस्तान, इराण, तुर्की, दक्षिण कोरिया, क्यूबा, साइप्रस, श्रीलंका या देशाने संवेदना व्यक्त करत भारताच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केल्या. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पंतप्रधान मोदींना उद्देशून ट्विट केले. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, इस्रायलचे लोक पीडितांच्या कुटुंबियांबद्दल आमच्या मनापासून संवेदना व्यक्त करतात. या दुःखाच्या वेळी इस्रायल भारतासोबत खंबीरपणे उभा नक्कीच आहे.
या बॉम्बस्फोटानंतर अमेरिकेने देखील स्पष्ट केले की, आम्ही भारतातील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. अमेरिकन दूतावासांनी त्यांच्या नागरिकांना लाल किल्ला आणि गर्दीच्या ठिकाणी जाण्यापासून दूर राहण्यास सांगितले. भारतात झालेल्या बॉम्बस्फोटानंतर जगात एकच खळबळ उडाल्याचे बघायला मिळाले.