मुंबई विभागीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धा जल्लोषात
धारावी, ता. १५ (बातमीदार) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर आणि किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन, मुंबई शहर यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विभागीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धा भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, धारावी येथे उत्साहात जल्लोषात पार पडली. स्पर्धेस जिल्हा क्रीडा अधिकारी मार्क धरमाई, क्रीडा अधिकारी दत्ता माने, फुलचंद कराड आणि साहिल उतेकर या मान्यवरांची उपस्थिती लाभली.
स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष उमेश मुरकर, सचिव राहुल साळुंखे, आंतरराष्ट्रीय पंच विघ्नेश मुरकर, सूर्यप्रकाश मुंडपात, मकरंद जोशी, विन्स पाटील, आशीष महाडिक, सांप्रती पाटील, अश्विनी जांबळे, आफताब खान यांनी मेहनत घेतली. जिल्हा प्रतिनिधी आशीष राणे, विशाल सिंग, निलेश भोसले तसेच तांत्रिक समितीचे सचिन वाडकर, मेडिकल टीमचे डॉ. अंकित गिरी व डॉ. स्वाती धूलिपला उपस्थित होते.
स्पर्धेत मुंबई शहरातील शाळा व महाविद्यालयांमधील अनेक खेळाडूंनी दमदार प्रदर्शन केले. त्यापैकी ग्रिशम पटवर्धन (व्ही. एन. सुळे विद्यालय), श्रेयांक मौर्या (श्री वल्लभ हायस्कूल), दुर्वा गावडे (महर्षी दयानंद कॉलेज), प्रज्ञेश पटवर्धन ( महर्षी दयानंद कॉलेज ), यथार्थ बुडमला (जय हिंद कॉलेज) यांनी उल्लेखनीय कामगिरी करत आपले कौशल्य सिद्ध केले. हे सर्व विजेते खेळाडू आता शालेय राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.