-rat१५p२०.jpg-
२५O०४५४८
रत्नागिरी : रत्नागिरी बार असोसिएशनतर्फे अॅड. राकेश भाटकर यांचा सत्कार करताना अॅड. विलास पाटणे. सोबत वकील.
-------
ॲड. राकेश भाटकर यांचा सत्कार
‘सीनिअर कौन्सिलपदी’ नियुक्ती; रत्नागिरीतून वकिलीची सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ : भारत सरकारचे सीनियर कौन्सिल म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल अॅड. राकेश भाटकर यांचा सत्कार रत्नागिरी बार असोसिएशनतर्फे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांच्या हस्ते करण्यात आला.
विधी व न्याय विभाग, भारत सरकार यांनी प्रस्तावित केलेले भारत सरकारचे सीनियर कौन्सिल- ग्रुप वन या पदावर भारताचे महामहीम राष्ट्रपती यांच्या मान्यतेने ॲड. भाटकर यांची मुंबई उच्च न्यायालय आणि त्याची खंडपीठे येथे भारत सरकारचे सीनियर कौन्सिलपदी नेमणूक झाली. ॲड. भाटकर अॅडव्होकेट असोसिएशन वेस्टर्न बारचे कोषाध्यक्ष आहेत. त्यांनी रत्नागिरीतून वकिलीची सुरुवात केली. सत्काराला उत्तर देताना ॲड. भाटकर यांनी ज्युनिअर वकिलांनी कोल्हापूर खंडपीठासमोर कामे चालवली पाहिजेत असे आवाहन केले. या प्रसंगी ॲड. अशोक कदम, ॲड. निनाद शिंदे, ॲड. प्रफुल्ल साळवी, ॲड. रत्नदीप चाचले, ॲड. नीलेश घैसास, ॲड. शाल्मली आंबुलकर, ॲड. नंदू गद्रे, ॲड. तुषार भाटकर आदी उपस्थित होते.