खेडमध्ये बाधित शेतकरी तीन हजारांवर
खेड, ता. १५ ः तालुक्यात ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसाने बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ३ हजार ३६६ वर पोहोचली आहे. एकूण ५९० हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, अंदाजे ५० लाख १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त भातपिकांचे पंचनामे करण्यात आले असून, शेतकऱ्यांना आता भरपाईची प्रतीक्षा आहे. अनेक ठिकाणी भातपिके आडवी होऊन भाताला पुन्हा कोंब फुटल्याने उत्पादन हातचे गेले आहे. दरम्यान, घडलेल्या नुकसानीमुळे सुक्या चाऱ्याचा प्रश्नही उभा ठाकण्याची शक्यता आहे. अजूनही अनेक शेतकरी भातकापणीच्या कामात व्यस्त आहेत.
--
अधिवक्ता परिषदेच्या
सहसचिवपदी अॅड. बुटाला
खेड, ता. १५ ः अधिवक्ता परिषद कोकण प्रांताच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, जिल्हाध्यक्षपदी अॅड. मनोहर जैन तर सहसचिवपदी अॅड. सिद्धेश बुटाला यांची निवड करण्यात आली आहे. खेड तालुकाध्यक्षपदी अॅड. संगीता बापट व महामंत्रीपदी अॅड. स्वरूप थरवळ यांची निवड झाली. रत्नागिरी जिल्हा न्यायालय येथे झालेल्या अधिवक्ता परिषद जिल्हा बैठकीत ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. उपाध्यक्ष (लिटिजेशन आयाम) अॅड. क्षितिज दामले, मंत्री अॅड. सुशील कदम, उपाध्यक्ष (आऊटरीच) अॅड. अमेय मालशे, मंत्री अॅड. दिया देवळेकर, उपाध्यक्ष अॅड. तेजकुमार लोखंडे, मंत्री अॅड. स्वप्नील खोपकर, कोषाध्यक्ष अॅड. ऋग्वेद भावे, कार्यालयीन मंत्री अॅड. प्रितेश, तसेच कार्यालयीन सहमंत्री अॅड. अनुजा राऊत यांची निवड करण्यात आली. तालुका कार्यकारिणी सदस्यपदी अॅड. अक्षया सोमण, अॅड. प्रणिता भेकरे, अॅड. महिमा सावंत, अॅड. प्रणीत साळवी, अॅड. कुणाल गायकवाड यांचा समावेश आहे. सल्लागार म्हणून अॅड. केतन पाटणे, मार्गदर्शक म्हणून अॅड. संदेश चिकणे व अॅड. हेमंत वडके तर निमंत्रित सदस्य म्हणून अॅड. प्रीती बोंद्रे यांची निवड झाली आहे.
---