पुणे : थकबाकीदारांनी पैसे भरल्याने त्यांचा चक्क सन्मान केल्याचा प्रकार आज विविध कार्यालयांमध्ये घडला आहे. दरम्यान पहिल्या दिवशी अभय योजनेतून ६ कोटी १५ लाख रुपये जमा झाले आहेत. पुणे महापालिकेच्या प्रकल्पांसाठी निधीची गरज आहे. हा निधी उभा करण्यासाठी १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत अभय योजना राबवून मिळकतकराच्या थकबाकीवर ७५ टक्के सवलत दिली जाणार आहे. यातून जमा होणारा निधी हा विकास आराखड्यातील रस्ते करणे, भूसंपादन करणे यासह अन्य कारणांसाठी वापरला जाणार आहे.
महापालिकेने यापूर्वी २०१५-१६, २०१६-१७, २०२०-२१, २०२१-२२ अशी चार वेळा अभय योजना राबविली होती. त्यानंतर आता यंदा निवासी आणि व्यावसायिक अशा सर्व मिळकतधारकांसाठी ही योजना राबविली जात असून, यामध्ये ४ लाख ८१ हजार ९०५ मिळती असून, त्यातून ५५२९ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. त्यापैकी आता किती रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा होतात हे पाहणे आवश्यक आहे. अभय योजनेची सुरुवात आजापासून झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर मिळकतकर विभागाचे प्रमुख रवी पवार यांनी परिपत्रक काढून नागरिकांच्या स्वागतासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयामध्ये अल्हाददायक वातावरण असावे.
अभय योजनेची माहिती देणारा फलक दर्शनी भागात लावावा, फुलांची, रांगोळीची सजावट करून करदात्यांचे प्रसन्न वातावरणात स्वागत करावे असे आदेश दिले होते. त्यानुसार आज महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये रांगोळी काढून, माळा लावून, दारावर फुले लावून थकबाकीदार मिळकतधाराकांच्या स्वागताची तयारी केली होती. काही ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले, ही करण्यात आले. महापालिकेकडून इतके आदरतिथ्य केले जात असल्याने थकबाकीदारांनाही आश्चर्याचा धक्का बसला. थकबाकीदारांचा सन्मान महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना रुचला नाही. पण साहेबांचा आदेश असल्याने आम्ही प्रसन्न वातावरणात सर्वांचे स्वागत केले असे एका कर्मचाऱ्याने सांगितले.
भिवंडीकरांकडे हजारो कोटींची थकबाकी‘‘अभय योनजेच्या पहिल्या दिवशी १ हजार ५३ जणांनी ६.१५ कोटी रुपयांची थकबाकी जमा केली आहे. थकबाकीदारांनी या योजनेकडे सकारात्मकपणे बघावे, त्यांनी नियमीत कर भरावा, थकबाकी कमी व्हावी या उद्देशाने कार्यालयामध्ये सजावट करावी, त्यांचे स्वागत करावे या उद्देशाने हे आदेश दिले होते. नियमीत करदाते आम्हाला सहकार्य असते.’’
- रवी पवार, उपायुक्त, मिळतकर विभाग
प्रामाणिक करदात्यांची लकी ड्रॉ गुंडाळली
प्रामाणिक करदाते दरवर्षी न चुकता मिळतकर भरतात. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून भेट वस्तू देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये लकी ड्रॉ काढून कार, दुचाकी, मोबाईल, टिव्ही यासारख्या वस्तू वाटप केल्या जात होत्या. पहिल्या वर्षी हा उपक्रम अतिशय उत्तमपणे पार पडला. पण दुसरऱ्यावर्षी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आणि प्रामाणिक करदात्यांच्या सन्मानाचा कार्यक्रम गुंडाळण्यात आला. पण आता याचा विरोधाभास म्हणजे महापालिकेचे अधिकारी चक्क परिपत्रक काढून थकबाकीदारांचे स्वागत करण्याचे आदेश देत आहेत.
Pune Municipal Corporation: महापालिकेची करआकारणी रखडली; समाविष्ट ३२ गावांतील व्यावसायिक, अनधिकृत मिळकतींवरून वादएकूण मिळकती - १४,८६,८६२
२०२५-२६चे अपेक्षित उत्पन्न - २५४५.११ कोटी रुपये
१ एप्रिल ते १५ नोव्हेंबरपर्यंतची जमा - १७८८.५९ कोटी रुपये
अभय योजनेसाठी पात्र थकबाकीदार - ४,८१,९०५
अपेक्षित वसुली - ५५२९.४१ कोटी रुपये
पहिल्यादिवशीची वसुली -६.१५ कोटी रुपये