ऑमलेट हा नाश्त्याच्या वेळी हमखास बनवला जाणारा आणि घरातील अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. प्रोटीनचा मुख्य स्रोत असलेल्या या ऑमलेटला तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकता, हे तुम्हाला माहीतच आहे. पण तुम्ही कधी वर्ल्ड्स बेस्ट ऑमलेट ट्राय केलं आहे का? काही छोट्या पण कमाल टिप्सने हे ऑमलेट इतकं फ्लफी, मऊ आणि रेस्टॉरंट-स्टाईल बनवता येतं की खाणारेही थक्क होतील. शेफ रणवीर ब्रारने सांगितलेली ही रेसिपी एकदा करून पाहिली की पुढच्या वेळी ‘साधं ऑमलेट’ हा पर्याय तुमच्या यादीतच राहणार नाही!
साहित्य3 अंडी
1-2 चमचे क्रीम
1 चमचा वितळलेले बटर
अर्धा चमचा चीज स्प्रेड (इच्छेनुसार)
तुमच्या आवडीनुसार तुम्ही मीठ, कांदा, टोमॅटो, मिरची असे वेगवेगळे पदार्थ अंड फेटताना घालू शकता.
एका बाउलमध्ये अंडी फोडून त्यात क्रीम आणि वितळलेले बटर मिसळा.
तुम्हाला जर चीज फ्लेव्हर हवा असेल पण तो सिक्रेट इंग्रेडियंट ठेवायचा असले, तर अंड्यांमध्ये अर्धा चमचा चीज स्प्रेड घाला.
याशिवाय त्यात कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, काळी मिरी वापडर असे इतर पदार्थ घातले तर ऑमलेट चवीला अजून छान लागते.
आता सर्व साहित्य नीट फेटून एकसारखे करा.
मंद आचेवर तवा गरम करायला ठेवा.
अंड्याचे मिश्रण तव्यावर ओता आणि हळूहळू जिगल करत रहा. ऑमलेट मध्यम आचेवरच शिजवा.
आता ऑमलेट हलकेसे सेट हलकेसे सेट झाल्यावर पलटी करा.
ऑमलेटला कधीही पूर्ण शिजू देऊ नका. हवे असल्यास फक्त ८०% गॅसवर शिजवा.
तवा गॅसवरून काढल्यानंतरही ऑमलेट स्वतःच्याच उष्णतेने शिजत राहील.
अशाप्रकारे वर्ल्ड्स बेस्ट ऑमलेट तुम्ही घरच्या घरीच बनवू शकता. पण हे ऑमलेट बनवताना काही टिप्स लक्षात ठेवल्या तर ऑमलेट एकदम परफेक्ट बनते.
टिप्सऑमलेट गरम तव्यावर झटपट शिजवू नका, हळूहळू शिजवलेले ऑमलेट अधिक फ्लफी आणि मऊ राहते.
चीज स्प्रेड वापरल्यास ऑमलेटला हलका चीज फ्लेव्हर येतो, पण तो दिसत नाही. तसेच चीज वारल्यामुळे पुन्हा मीठ घालण्याची गरज नसते.