भारत-पाक पुन्हा भिडणार, खेळाडू हँडशेक करणार? हाय व्होल्टेज ड्रामाकडे क्रिकेट जगताचे लक्ष
GH News November 16, 2025 03:10 PM

Rising Stars Asia Cup Match Today: भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ आज पुन्हा आमने-सामने येणार आहे. एसीसी पुरुष आशिय कप रायझिंग स्टार्स 2025 (ACC Men’s Asian Cup Rising Stars 2025) मध्ये दोन्ही संघात हायहोल्टेज ड्रामा रंगेल. या सोमवारी 10 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ कारमध्ये स्फोट झाला होता. त्यात 12 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण गंभीर जखमी झाले. या दहशतवादी हल्ल्याचे तार थेट पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात भारत आणि पाकचे खेळाडू हस्तांदोलन करतील का नाही याची याकडे क्रिकेट जगताचं लक्ष लागलं आहे.

आज दोन्ही संघात सामना

आज 16 नोव्हेंबर रोजी रविवारी भारत अ आणि पाकिस्तान शाहीन यांच्यात सामना होईल. गट ब सामना दोहा येथील वेस्ट अँड पार्क या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावनर रात्री 8 वाजता सुरु होणार आहे. क्रिकेटप्रेमी हा सामना सोनी स्पोर्ट्स आणि त्यांच्या संकेतस्थळावर पाहु शकतील. तर या सामान्याचे अपडेट्स क्रिकेटप्रेमींना टीव्ही 9 मराठी आणि नेटवर्कवर घेता येतील.

आठ संघ आशिया कपसाठी मैदानात

एसीसी पुरुष आशिया कप रायझिंग स्टार्स 2025 मध्ये एकूण 8 संघ खेळत आहेत. भारत अ संघ, संयुक्त अरब अमिरात, ओमान आणि पाकिस्तान शाहिन्ससह ब गटात आहेत. श्रीलंका अ, बांगलादेश अ, अफगाणिस्तान अ, हाँगकाँग यांचाही समावेश आहे. प्रत्येक गटात चार संघ आहेत. पहिल्या सामन्यात भारतीय तडफदार संघाने युएईचा 148 धावांनी धुव्वा उडवला. तर पाक शाहिन्सने ओमानला 40 धावांनी नमवले.

दोन्ही संघ हस्तांदोलन करणार का?

आशिया कप 2025 मध्ये कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघाशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. तर भारतीय संघाने सुद्धा पाकिस्तानी खेडाडूंशी शेकहँड केला नव्हता. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे टीम इंडियाने हा निर्णय घेतला होता. तर आता दिल्ली स्फोटाची सूई पूर्णतः पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहमदकडे असल्याने दोन्ही संघात हस्तांदोलन होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.