केवळ मैथिली ठाकूर नव्हे तर 'या' 10 नेत्यांच्या नावावर आहे सर्वात कमी वयात आमदार होण्याचा मान
Sarkarnama November 17, 2025 09:45 AM
Maithili Thakur मैथिली ठाकूर

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर विजयी झाल्या आहेत.

Maithili Thakur आमदार

वयाच्या 25 व्या वर्षी आमदार बनल्यामुळे त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. तर मैथिलीसह कमी वयात आमदार झालेल्या भारतातील इतर नेत्यांची नावे जाणून घेऊया.

MLA Rohit Patil रोहित पाटील

महाराष्ट्रातील तासगाव-कवठे महांकाळ मतदारसंघातून विजयी झालेल आर.आर. आबा यांचे पुत्र रोहित पाटील वयाच्या 26 व्या वर्षी आमदार झाले. ही त्यांची आमदारकीची पहिलीच टर्म आहे.

Umed Singh उमेद सिंग

1962 साली वयाच्या 25 व्या वर्षी राजस्थानातील बारमेर मतदारसंघातून उमेद सिंग हे आमदार बनले. भारतातील सुरुवातीच्या तरुण आमदारांपैकी ते एक आहेत. ते 1980 आणि 1985 मध्ये विजय झालेत.

Shrikant Jichkar श्रीकांत जिचकार

भारतातील सर्वाधिक पदव्या मिळवलेली व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे श्रीकांत जिचकर हे 1980 मध्ये वयाच्या 26 व्या वर्षी महाराष्ट्राचे सर्वात तरुण आमदार बनले.

Mansukh Mandaviya मनसुख मांडवीय

केंद्रीय मंत्री होण्यापूर्वी, 2002 मध्ये वयाच्या 28 व्या वर्षी मनसुख मांडवीय गुजरात विधानसभेतील सर्वात तरुण आमदार बनले. त्यांनी राज्यसभा आणि मंत्रिमंडळात काम केलं आहे.

Arun Verma अरुण वर्मा

समाजवादी पक्षाचे अरुण वर्मा 2012 मध्ये वयाच्या 25 व्या वर्षी आमदार झाले. ते यूपीतील सर्वात तरुण आमदारांपैकी एक होते. त्यांना 'आदर्श तरुण आमदार पुरस्कार' मिळाला आहे.

K M Sachin Dev के. एम. सचिन देव

के. एम. सचिन देव 2021 मध्ये वयाच्या 28 व्या वर्षी केरळच्या बालुसेरी येथून निवडून आलेले सचिन देव 15 व्या केरळ विधानसभेतील सर्वात तरुण आमदार बनले.

Narinder Kaur Bharaj नरिंदर कौर भराज

2022 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत 'आप'चे उमेदवारी असलेले नरिंदर कौर भराज वयाच्या 27 व्या वर्षी आमदार झाले. त्यांनी कॅबिनेट मंत्री विजय इंदर सिंगला यांचा पराभव केला.

Aditya Surjewala आदित्य सुरजेवाला

काँग्रेस नेते रणजित सुरजेवाला यांचे पुत्र आदित्य सुरजेवाला 2024 मध्ये वयाच्या 25 व्या वर्षी हरियाणाचे सर्वात तरुण आमदार बनले.

Mynampally Rohith मयानपल्ली रोहित

2023 साली मयानपल्ली रोहित हे वयाच्या 26 व्या वर्षी तेलंगणातील मेडक येथून आमदार बनले. पहिल्या कार्यकाळात ज्येष्ठ नेते पद्मा देवेंद्र रेड्डी यांचा पराभव केला होता.

Upasna LB Mohapatra उपासना महापात्रा

ओडिशातील ब्रह्मगिरी येथील भाजप उमेदवार उपासना महापात्रा 2024 मध्ये वयाच्या 26 व्या वर्षी राज्यातील सर्वात तरुण आमदार बनल्या.

Nitish Kumar NEXT : नीतीश कुमार 9 वेळा CM पण सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपद भूषवण्याचा मान 'या' नेत्याच्या नावावर; 24 वर्षांहून अधिक काळ होते पदावर क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.