बारामती, ता. १७ : येथील आचार्य ॲकॅडमीच्या वतीने मेगा एएसएटी-आचार्य स्कॉलरशीप कम अॅडमिशन टेस्ट २०२५ या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉक्टर, इंजिनिअर घडविण्यासोबत सर्वांगिण विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या आचार्य ॲकॅडमीच्या वतीने या परीक्षेचे आयोजन केल्याची माहिती संस्थापक ज्ञानेश्वर मुटकुळे यांनी दिली.
इयत्ता चौथी ते दहावीमधील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा असून जेईई, नीट, सीईटी तयारीसाठी सर्वोत्तम संधी उपलब्ध करून देणारी ही परीक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले.
आचार्य ॲकॅडमीच्या बारामती व इंदापूर शाखेमध्ये २३ नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोनपर्यंत ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेच्या नोंदणीसाठी विद्यार्थी ७२४९५११७२९ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.
इयत्ता अकरावीसाठी १ लाख ११ हजारांपासून ते दोन लाख तर पाचवी ते दहावीपर्यंत पाच हजारांपासून ते पंचवीस हजारांपर्यंत शिष्यवृत्ती देऊ केली जाणार आहे. आचार्य ॲकॅडमीतर्फे विद्यार्थ्यांना दिली जाणारी ही सर्वात मोठी शैक्षणिक संधी असून राज्यभरातील विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन ज्ञानेश्वर मुटकुळे यांनी केले आहे.