Indian Stock Market Today : सोमवारी भारतीय शेअर बाजारात तेजी दिसली. दिवसभरातील सकारात्मक व्यवहारानंतर दोन्ही मुख्य निर्देशांक हिराव्या रंगात बंद झाले.
सेन्सेक्स 388 अंकांनी वाढून 84,950 वर, तर निफ्टी निर्देशांक 103 अंकांच्या वाढीसह 26,013 अंकांवर बंद झाला. बाजारात आज सर्व निर्देशाकांनी हिरव्या रंगात व्यवहार केले.
आज सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि फायनान्सियल (वित्तीय) क्षेत्रात गुंतवणूकदारांची जोरदार खरेदी झाली. ऑटो, ऊर्जा, मीडिया आणि ग्राहक-केंद्रित कंपन्यांमध्येही चांगली तेजी दिसली. तंत्रज्ञान आणि मेटल सेक्टरमध्ये किंचित नफा-वसुली झाल्यामुळे तेथे जास्त वाढ झाली नाही. एकूणच बाजाराचा सूर सकारात्मक राहिला.
आजच्या बाजारातील टॉप ट्रेड्सTata Motors: दुसऱ्या तिमाहीतील नफा वाढल्याचे जाहीर झाल्यानंतरही कंपनीचे शेअर्स 4.7% घसरले. कंपनीने यूकेमधील तिच्या Jaguar Land Rover या युनिटसाठी FY26 मार्जिन आउटलुक कमी केल्याने ही घसरण झाली.
Ideaforge Technology: कंपनीला संरक्षण क्षेत्रातील 100 कोटी रुपयांहून अधिक ऑर्डर मिळाल्यामुळे शेअर्स 8.25% वाढले.
IRB Infrastructure: 9,270 कोटी रुपयांच्या मोठ्या प्रकल्प मिळाल्याने आज शेअर्सवाढले.
Arayana Hrudayalaya Ltd (14.53%)
Mangalore Refinery And Petrochemicals Ltd. (6.44%)
DCB Bank Ltd. (6.07%)
Housing and Urban Development Corporation Ltd (5.96%)
Ashoka Buildcon Ltd. (-5.01)
Tata Motors Passenger Vehicles Ltd. (-4.73%)
Omaxe Ltd. (-3.75%)
Tarsons Products Ltd. (-3.63%)
विस्तृत बाजारात, बँक निफ्टी 0.8% वाढ घेत 59,000 अंकांवर, तर मिड-कॅप्स 0.7% वाढून विक्रमी नवीन उच्चांकावर पोहोचले. बाजारातील फायनान्सियल शेअर्समध्ये 0.6% वाढ झाली. अमेरिकेच्या टॅरिफ दबावाचा सामना करणाऱ्या निर्यात-आधारित उद्योगांना RBIकडून मिळालेल्या उपाययोजनांमुळे या सेक्टरला बळ मिळाले.