सकाळचा नाश्ता हेल्दी आणि पटकन तयार होणारा असावा असं प्रत्येकालाच वाटतं. त्यातही हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असेल तर पौष्टिकतेलाही भर पडते. अशाच हेल्दी पर्यायांपैकी एक आहे पालक ढोकळा आहे. पारंपरिक ढोकळ्याला हा हिरवा ट्विस्ट देऊन त्याला अधिक स्वादिष्ट, मऊ आणि फ्लफी बनवता येतं. पालकातील लोह, कॅल्शियम आणि फायबर शरीराला आवश्यक ऊर्जा देतात, तर रवा आणि दही यामुळे ढोकळ्याला उत्तम टेक्स्चर मिळतं. पालक ढोकळा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.
पालक ढोकळा बनवण्यासाठी लागणारे साहित्यपालक
जीरं
पाणी
रवा
दही
मीठ
सोडा
तेल
पालक ढोकळा बनवण्यासाठी लागणारे साहित्यसर्वात आधी पालक गरम पाण्याने धुवावे. नंतर रवा, दही आणि पाणी सर्व एकत्र चांगले मिसळा आणि झाकून ठेवा. नंतर मिक्सरच्या भांड्यात हे सारण आणि पालक टाकन चांगले बारिक करावे. नंतर मीठ, सोडा आणि जीर टाका. नंतर एका भांड्यात तेल लावून हे सारण टाका आणि वाफवून घ्यावे. स्वादिष्ट पालक ढोकळा तयार आहे.