आयुष्याचा शेवट ओळखता येतो? गरुड पुराण सांगतं मृत्यूपूर्वी दिसणारे 7 संकेत
esakal November 19, 2025 12:45 PM

Garuda Purana end life Signs

जन्म आणि मृत्यूचं चक्र

जन्म आणि मृत्यूचं चक्र अव्याहतपणे सुरूच असतं. मृत्यू हे एक गूढ आहे, पण गरुड पुराणात मृत्यूपूर्वी मिळणारे संकेत (Signs) सांगितले आहेत.

Garuda Purana end life Signs

मृत्यूची प्रक्रिया कधी सुरू होते?

हिंदू धर्मानुसार, कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूची प्रक्रिया साधारणपणे सहा महिन्यांपूर्वीच सुरू झालेली असते, असे मानले जाते.

Garuda Purana end life Signs

नाभीचक्र तुटणे

पुराणानुसार, मृत्यूची चाहूल सर्वात प्रथम नाभिचक्रावर (Navel Chakra) जाणवते. मृत्यू येण्यापूर्वी नाभीचक्र तुटण्यास सुरुवात होते.

Garuda Purana end life Signs

शरीराचा वास आणि सावली

मृत्यूपूर्वी व्यक्तीच्या शरीरातून मृतदेहासारखा विचित्र वास येऊ लागतो. तसेच, त्याला त्याची सावली (Shadow) डोक्याशिवाय किंवा वेगळी दिसू लागते.

Garuda Purana end life Signs

पाहण्याची क्षमता संपुष्टात

मृत्यू जवळ आल्यास, संबंधित व्यक्तीला त्याचा चेहरा आरसा, तेल किंवा पाण्यात दिसणं बंद होतं. त्याची पाहण्याची आणि ऐकण्याची क्षमता संपुष्टात येते.

Garuda Purana end life Signs

यमदूत दिसू लागतात

मृत्यूच्या काही वेळ आधी व्यक्तीला त्याच्या आजूबाजूला यमदूत दिसू लागतात. तो त्यांना पाहून घाबरू लागतो, पण शेजारी उभे असलेले नातेवाईक दिसत नाहीत.

Garuda Purana end life Signs

तळहाताच्या रेषा

मृत्यूपूर्वी संबंधित व्यक्तीच्या तळहातावरच्या रेषा (Palm Lines) अस्पष्ट होतात. त्या इतक्या पुसट होतात की त्या सहजपणे दिसतदेखील नाहीत.

Garuda Purana end life Signs

डिस्क्लेमर :

या वेब स्टोरीमध्ये दिलेली माहिती गरुड पुराण आणि धार्मिक ग्रंथांवर आधारित आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Chanakya Niti for Selfish People

चांगल्या लोकांचीच फसवणूक! चाणक्य नीती सांगते; स्वार्थी लोकांची ओळख अशी करा येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.