सोनई : खरवंडी (ता. नेवासे) येथील केशव आनंदा थोरात यांच्या आत्महत्येस कारणीभूत म्हणून जबाजी गणपत फाटके यांच्यासह समता शिक्षण संस्थेतील सहा सदस्यांवर शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Leopard Attack: होत्या गाई म्हणून वाचल्या बाई ! 'टाकळी हाजी येथे बिबट्याचा महिलेवर हल्ला'; गायीच्या प्रतिहल्ल्याने वाचला जीव..शिक्षण संस्थेत संधी दिलेल्या व्यक्तीनी शिवीगाळ, दमदाटी व मानसिक त्रास दिल्याची चिठ्ठी सापडल्यानंतर घटनेच्या सातव्या दिवशी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरवंडी येथील व्यावसायिक केशव थोरात यांनी सोमवारी (ता. १०) राहत्या घराजवळील शेडमध्ये छताला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल झाला होता.
थोरात यांचे चिरंजीव अरुण थोरात यांना वडिलांचे कागदपत्र पाहात असताना आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडल्याने त्यांनी फिर्याद दिल्यानंतर जबाजी फाटके, समता शिक्षण संस्थेचे सदस्य आबासाहेब जबाजी फाटके, भरत संतराम फाटके, जयवंत बाबूराव लिपाने, मच्छिंद्र मुरलीधर शिंदे, बन्सी रामभाऊ म्हस्के व गोरक्षनाथ विश्वनाथ कुऱ्हे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षण संस्थेच्या वरील सहा जणास घेतल्यानंतर जबाजी फाटके यांनी वरील सहा जणाला हाताशी धरुन थोरात यांनाच हटविण्याचा प्रयत्न केला होता.
पुढे हा वाद नगर व पुणे येथील सहायक व धर्मदाय आयुक्तांच्या दालनात गेला. सात आरोपींनी सर्व दावे मागे घेतले तर खर्च झालेली रक्कम देतो असे सांगितले मात्र दावे मागे घेऊनही रक्कम देण्याऐवजी शिवीगाळ व दमदाटी केल्याने वडील केशव थोरात यांनी आत्महत्या केली असून तसे त्यांनी लिहून ठेवलेल्या कागदावर नमूद केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास हवालदार बी. एन. कारखिले करीत आहेत.
Farmer Women: बिबट्याच्या भितीने नवीन ‘संरक्षण कवच’; पिंपरखेड परिसरातील शेतकरी महिलांच्या गळ्यात खिळ्यांचे पट्टे, अनोख्या उपायाची चर्चा..आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल सात जणांवर गुन्हा दाखल केल्यानंतर आज विशेष पथक नेमून आरोपींचा शोध घेण्यात आला. मात्र गावात, घरी व नातेवाइकांकडे कुणीच सापडले नाही. आरोपींचा शोध सुरु आहे.
- अशिष शेळके, सहायक पोलिस निरीक्षक, शनिशिंगणापूर