दुसऱ्या कसोटीतही भारतीय संघ 10 फलंदाजांसह उतरणार? गुवाहाटी कसोटीपूर्वी अशा घडामोडी
GH News November 19, 2025 09:11 PM

दक्षिण अफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमवण्याची वेळ टीम इंडियावर आली आहे. पहिल्या कसोटीत फलंदाजाच्या क्षुल्लक चुकांचा भुर्दंड पराभवातून मिळाला. दुसरीकडे, प्रशिक्षक गौतम गंभीर टीकेचा धनी ठरत आहे. पण खेळाडूंना त्याचं भान आहे की नाही असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका गमावल्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी खेळण्याचं स्वप्न भंगलं होतं. आता पुन्हा त्याचा चुका टीम इंडिया करताना दिसत आहे. टीम इंडियाची जमेची बाजूच आता कमकुवत होताना दिसत आहे. फलंदाजांचा अंदाजही कसंही या आणि खेळून जा असाच दिसत आहे, त्यामुळे क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे, पहिल्या कसोटीत कर्णधार शुबमन गिलला झालेली दुखापत महागात पडली. दोन्ही डावात टीम इंडियाला 10 फलंदाजांसह उतरावं लागलं. दोन्ही डावात एक फलंदाज शॉर्ट होता आणि भारताचा पराभवही 30 धावांनी झाला. दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाला ताकही फुंकून प्यावं लागणार आहे. दुसरीकडे, शुबमन गिल काहीही करून दुसऱ्या कसोटीत खेळण्याचा हट्ट करत असल्याची चर्चा आहे.

भारतीय कर्णधार शुबमन गिलला दुखापत झाली आहे आणि त्यातून पूर्णपणे सावरलेला नाही. आता फिटनेस टेस्ट देऊन खेळण्याचा विचार करत आहे. यासाठी टीम इंडियासोबत गुवाहाटीला गेला आहे. पण शनिवारपर्यंत फिट होणं कठीण आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, शुबमन गिल गुरूवार आणि शुक्रवारी होणाऱ्या ट्रेनिंग सेशनमध्ये खेळू इच्छित आहे. त्याच्या मानेला पट्टी आहे. पण त्याची दुखापत बरी होत असल्याचं दिसत आहे. बीसीसीआयचे सचिव देवाजीत सैकिया यांनी सांगितलं की, गिल बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमच्या देखरेखीखाली आहे. दुसऱ्या कसोटीत खेळणार की नाही याचा निर्णय 21 नोव्हेंबरला घेतला जाईल. पण त्याची संघात निवड झाली आणि पुन्हा दुखापत झाली तर 10 फलंदाजांसह खेळावं लागेल, अशी भीती क्रीडाप्रेमींना आहे.

रिपोर्टनुसार, गुवाहाटीची खेळपट्टीही फिरकीला मदत करणारी आहे. कोलकात्यासारखीच ही खेळपट्टी असणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना घाम फुटला आहे. जर तशीच खेळपट्टी असेल आणि भारताने नाणेफेक गमावली तर भारतीय संघाला पुन्हा एकदा पराभवाला समोरं जावं लागेल. त्यामुळे 11 खेळाडूंची निवड करताना कोणी जमखी होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेच ऋषभ पंतही जखमी झाला होता. पण फलंदाजीसाठी उतरला होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.