Mumbai Crime : मामा की कंस मामा? भाचीला घेऊन लोकलमध्ये चढला, पुढच्याच क्षणी… दृश्य पाहून भेदरले प्रवासी !
Tv9 Marathi November 20, 2025 03:45 AM

मुंबईत गुन्ह्यांच्या अनेक घटना घडत असतात. मात्र एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यांसमोरच जीवघेणी घटना घडली तर ? ते दृश्य विसरणं शेवटपर्यंत कठीण होतं. मुंबईतील लोकलमध्येही नुकताच असा प्रकार घडला, ते दृश्य पाहून प्रासी अक्षरश: गळपटलेच. लोकलमध्ये आपल्या भाच्चीसह चढलेल्या मामानेच, गाडीने वेग पकडल्यावर त्याच भाचीला लोकलमधून खाली ढकलून दिलं आणि ठार (Crime News ) केलं. चालच्या गाडीतून रुळांवर पडलेल्या त्या निरागस मुलीचा हकनाक जीव गेला. हे पाहून लोकलमधल्या इतर प्रवाशांना मोठा धक्का बसला, पण त्यांच्यापैकी काहींनी हिंमत करत आरोपी मामाला पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केलं. लोकलमधल्या या घटनेने प्रचंड खळबळ माजली आहे.

माहितीनुसार, वसई येथे मामानेच चालत्या लोकल ट्रेनमधून 16 वर्षीय भाचीला खाली ढकललं. खाली पडून गंभीर जखमी झालेल्या त्या मुलीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. कोमल सोनार असे मृत मुलीचे नाव असून ती अवघ्या 16 वर्षांचीच होती. तर अर्जुन असं मारेकरी, आरोपी मामाचं नाव आहे. तिच्या मृत्यूमुळे सगळेच प्रवासी हादरले. तरीही त्यांनी हिमतीने आरोपी मामाच्या मुसक्या आवळल्या आणि पोलिसांना या घटनेची माहिती देऊन आरोपीला त्यांच्या ताब्यात दिलं.

घरातून निघून गेली होती कोमल

मिूळालेल्या माहितीनुसार, कोमल ही 15 नोव्हेंबर रोजी तिच्या घरातन निघून गेली, सर्वांनी तिचा शोध सुरू केला. अखेर की 16 नोव्हेंबरला नालासोपारा येथील तिच्या छोट्या मामाच्या घरी आढळली, त्यामुळे कुटुंबियांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. त्यानंर तिची मामी कोमलला परत आणण्यासाठी तिथे गेली, मात्र तिला पाहून कोमल पुन्हा गायब झाली,. अखेर कुटुंबियांनी वलिव पोलीस ठाण्यात धाव घेतली. संशयावरून वलिव पोलीस ठाण्यातील अधिका्यांनी अपहरणाची तक्रार नोंदवली.

त्यानंतर यानंतर मामाचं नाव पुढे आलं. कोमलचा मोबाईल वापरून आरोपी अर्जुन सोनीने तिच्या आईला संपर्क केला, पण तिला घरी आणण्यास नकार दिला. 17 नोव्हेंबर रोजी भाईंदर परिसरात रेल्वे अपघातात कोमलचा मृतदेह आढळला आणि कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र हा अपघाती मृत्यू नव्हे तर खून असल्याचेही काही वेळातच पुढे आलं. कारण भाईंदर स्टेशनवरून चर्चगेट–विरार लोकलमध्ये प्रवास करताना दरवाज्याशी उभ्या अवस्थेत मामानेच कोमलला मागून ढकललं. त्यानेची तिची हत्या केल्याचं तपासात समोर आलं. त्यानंतर लोकलमधील प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. कोमलच्या मृतदेहाची ओळख तिच्या मोठ्या मामाने पटवली असून प्रकरणाचा तपास रेल्वे पोलिसांकडून वलिव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र छोट्या मामाने त्याच्याच भाचीची हत्या का केली त्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.