SL vs ZIM : श्रीलंका पहिल्या विजयासाठी सज्ज, झिंबाब्वेसमोर सलग दुसरा पराभव टाळण्याचं आव्हान
Tv9 Marathi November 20, 2025 04:45 AM

पाकिस्तानने श्रीलंका क्रिकेट टीमवर 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानने श्रीलंकेचा 3-0 ने धुव्वा उडवला. त्यानंतर आता पाकिस्तानमध्ये टी 20I ट्राय सीरिजचा थरार रंगत आहे. या तिरंगी मालिकेत पाकिस्तानसह झिंबाब्वे आणि श्रीलंका यांच्याच चुरस आहे. पाकिस्तानने या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात झिंबाब्वेवर विजय मिळवला. पाकिस्तानने 18 नोव्हेंबरला झिंबाब्वे विरुद्ध 5 विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर आता स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंका विरुद्ध झिंबाब्वे आमनेसामने असणार आहेत. श्रीलंकेचा हा पहिला तर झिंबाब्वेचा दुसरा सामना असणार आहे.

श्रीलंकेचा झिंबाब्वे विरुद्ध हा सामना जिंकून मालिकेत विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला झिंबाब्वेसमोर सलग दुसरा पराभव टाळण्याचं आव्हान असणार आहे. दासून शनाका हा श्रीलंकेचं नेतृत्व करणार आहे. तर सिकंदर रझा याच्याकडे झिंबाब्वेच्या नेतृत्वाची धुरा आहे. हा सामना कधी आणि कुठे पाहता येणार? हे जाणून घेऊयात.

श्रीलंका विरुद्ध झिंबाब्वे सामना कधी?

श्रीलंका विरुद्ध झिंबाब्वे सामना गुरुवारी 20 नोव्हेंबरला होणार आहे.

श्रीलंका विरुद्ध झिंबाब्वे सामना कुठे?

श्रीलंका विरुद्ध झिंबाब्वे सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.

श्रीलंका विरुद्ध झिंबाब्वे सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

श्रीलंका विरुद्ध झिंबाब्वे सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 6 वाजता टॉस होणार आहे.

श्रीलंका विरुद्ध झिंबाब्वे सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

श्रीलंका विरुद्ध झिंबाब्वे सामन्याचं भारतात प्रसारण करण्यात येणार नाही.

श्रीलंका विरुद्ध झिंबाब्वे सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

श्रीलंका विरुद्ध झिंबाब्वे सामना मोबाईलवर स्पोर्ट्स टीव्ही या युट्यूब चॅनेलवर पाहायला मिळेल.

झिंबाब्वे टीम कमबॅक करणार?

दरम्यान झिंबाब्वेने पाकिस्तान विरुद्ध चिवट झुंज दिली. झिंबाब्वेने पाकिस्तानसमोर 148 धावांचं आव्हान ठेवलं होतं. झिंबाब्वेला हा सामना जिंकता आला नाही. मात्र झिंबाब्वेने पाकिस्तानला सहजासहजी विजयी होऊन दिलं नाही. पाकिस्तान टीमने 4 बॉलआधी विजयी आव्हान पूर्ण केलं. त्यामुळे आता झिंबाब्वे क्रिकेट टीम कमबॅक करत पहिला विजय मिळवणार का? याचीही उत्सूकता चाहत्यांना आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.