Latest Office News : फरीदाबादमधील एका २३ वर्षीय तरुणाने ऑफिसमधील टॉक्सिक वातावरणामुळे अचानक नोकरी सोडल्याची धक्कादायक स्टोरी रेडिटवर शेअर केली आहे. वेळेवर पगार मिळत असूनही कार्यालयातील दबाव, विचित्र नियम आणि मॅनेजरचा हुकूमशाही स्वभाव यामुळे त्याचा संयम अखेर सुटला.
WFH म्हणजेच ‘सुट्टी’?
तरुणाच्या म्हणण्यानुसार, जेव्हा जेव्हा तो एक-दोन दिवस घरून काम करायचा तेव्हा मॅनेजरचा सूर चिडचिडा व्हायचा. एकदा तर त्याने स्वतः सांगितले होते की आज काम कमी आहे, त्यामुळे तो घरून लॉग इन राहील. पण मॅनेजरचा आदेश काम नाही? मग रजा टाक.
कर्मचारी दिवसभर कॉलवर उपलब्ध असला, लॉग इन केलेला असला तरी शांत दिवस म्हणजे त्याला काही काम नाही असा मॅनेजरचा निष्कर्ष असतो.
कंपनीत महिन्याला दोन स्मॉल लीव्हची सोय होती. दोन तास उशिरा येण्याची मुभा होती. एका दिवशी तरुण फक्त २० मिनिटे उशिरा पोहोचला. त्याला वाटलं अलर्ट देण्यात आला; पण त्याला थेट हाफ डे मार्क करा असा आदेश मिळाला. हाफ डे घेतल्यानंतरही त्याच्यावर पूर्ण दिवसाचे काम सोपवले गेले. तो माझ्यासाठी शेवटचा धक्का होता, असे सांगत त्याने त्याच दिवशी राजीनामा दिला.
Goa New Rules : गोव्याला जाताय? मग अजिबात करू नका 'या' 3 चुका, नाहीतर नव्या नियमानुसार द्यावा लागेल हजारोंचा दंडतरुणाने दावा केला की त्याच्या जाण्यानंतर मॅनेजरने इतरांना सांगितले, याने आयुष्यातली सर्वात मोठी चूक केली. याला पुन्हा नोकरी मिळणार नाही.
यावर तरुणाने रेडिटवर रोखठोक लिहिले..
मला संपूर्ण टीमचे काम करवून घेतले, WFH ला सुट्टी टाकायला लावली पैसे कापले, उपस्थिती शाळेसारखी तपासली…आणि मी तुमचा ऋणी राहू? अजिबात नाही..
पोस्ट पाहताच अनेकांनी तरुणाच्या निर्णयाचे कौतुक केले. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.. कोणीही असे वागणूक सहन करू नये, अशा प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी तर कंपनीचे नाव उघड करण्याचा सल्ला दिला, जेणेकरून अशा मॅनेजरांना धडा मिळेल.