Eknath Shinde: पक्षांतरावरुन शिवसेनेत प्रचंड नाराजी! एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; थेट अमित शहांसोबत करणार चर्चा
Sarkarnama November 20, 2025 05:45 AM

Eknath Shinde: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग सुरु आहे. स्थानिक पातळीवर निवडणुका असल्यानं त्या तळागळातल्या कार्यकर्त्यांसाठी महत्वाच्या मानल्या जातात. या निवडणुकांमध्ये कोणीही कोणाशीही युती-आघाडी करु शकतो, त्यावर पक्ष श्रेष्ठींकडून शक्यतो निर्बंध घातले जात नाहीत. त्यामुळं स्थानिक पातळीवर राजकारणात सक्रीय होण्यासाठी बऱ्याचदा पक्षाच्या कार्यकर्त्यांची जिथं संधी मिळेल तिथं घुसण्याची धडपड सुरु असते. त्यामुळेच सध्या कार्यकर्त्यांच्या एका पक्षातून दुसऱ्या पक्षांमध्ये उड्या मारताना दिसत आहेत. त्यानुसार कल्याण-डोंबिवली हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पण याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर एकनाथ शिंदेंच्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला.

यामुळं स्थानिक स्तरावर पक्ष कमकुवत झाल्यानं शिवसेनेत प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. हा प्रकार थांबवा यासाठी एकनाथ शिंदे हे आज दिल्लीला रवाना झाले आहेत. या ठिकाणी ते गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्या भेटीमध्ये काहीतरी तोडगा निघेल किंवा महत्वाची घडामोड घडू शकते, अशीही चर्चा सुरु आहे.

Aadhaar Card : आधार कार्डवरून नाव अन् पत्ता गायब होणार; केंद्राचा मोठा निर्णय! शिवसेनेत प्रचंड नाराजी

कल्याण-डोंबिवलीतील या मोठ्या प्रमाणावरील पक्षांतराच्या घटनेनंतर शिवसेनेमध्ये नाराजी पसरली असून काल पार पडलेल्या राज्याच्या कॅबिनेट बैठकीतही शिवसेनेच्या आमदारांनी हजेरी लावली नव्हती. प्री कॅबिनेटच्या शिवसेनेच्या बैठकीत बहिष्कार घालण्याबाबत चर्चा झाल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळंच केवळ नावाला म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेटच्या बैठकीला हजेरी लावली तर शिवसेनेच्या मंत्र्यांनी या बैठकीकडं पाठ फिरवली. या नाराजीबाबत माध्यमांनी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचा चांगलाच पिच्छा पुरवला पण महायुतीत कुठलीही नाराजी नसल्याचं शिवसेनेचे नेते मंडळी सांगत होते. पण आज यावर आता शिक्कामोर्तब झालं असून एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झाले आहेत, ते केवळ भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्यासाठीच, असं सुत्रांकडून कळतं आहे.

Rohini Yadav Net Worth : लालूंची कन्या रोहिणी आचार्य 'सुपर रिच'! 'नेट वर्थ' तेजस्वीपेक्षा 4 पटीनं जास्त, पतीही बक्कळ श्रीमंत अमित शहांची घेणार भेट

दरम्यान, आज संध्याकाळी एकनाथ शिंदे हे अमित शहा यांची भेट घेऊन आपला बालेकिल्ला असेलल्या कल्याण-डोंबिवलीसह इतर भागात ज्या प्रकारे भाजपनं शिवसेनेचे नगरसेवक आणि कार्यकर्ते फोडले आहेत ते अत्यंत चुकीचं असून यामुळं शिवसेना या भागात मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळं हे प्रकार तातडीनं थांबवायला हवेत अशी विनंतीच ते अमित शहांकडे करणार असल्याचं कळतं आहे. त्यामुळं त्यांच्या संभाव्य भेटीत काय तोडगा निघतो किंवा आणखी काही महत्वाच्या घडामोडी घडतात का? यावर लक्ष ठेवावं लागणार आहे.

Ajit Pawar : कोकणात मतदानाआधीच राष्ट्रवादीने उधळला विजयी गुलाल! पेण नगर पालिकेत अजितदादांचा उमेदवार बिनविरोध उद्या बिहारच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी

तसंच उद्या बिहारच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधीसोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला भाजपशासित राज्यांतील सर्व मुख्यमंत्री आणि इतर महत्वाचे मंत्री हजेरी लावणार आहेत. त्यामुळं राज्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील बिहारला शपथविधी सोहळ्यासाठी जाणार आहेत. पण तत्पुर्वीच एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची आज भेट घेऊन राज्यातील पक्षांतराचा विषय मार्गी लावण्याची शक्यता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.