मानवी जीवनावर एक गंभीर संकट ओढवण्याची शक्यता आहे. अमेरिकेतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पहिल्यांदाच मानवाला प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या बर्ड फ्लू विषाणूची लागण झाली आहे. या दुर्मिळ H5N5 एव्हीयन इन्फ्लूएंझामुळे एका वृद्ध व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. ग्रे हार्बर काउंटीमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीला सुरुवातीला ताप, चिडचिडेपणा आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. या व्यक्तीची चाचणी केल्यानंतर त्याला पक्ष्यांमध्ये आढळणाऱ्या H5N5 बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
या व्यक्तीला बर्ड फ्लूची लागण कशी झाली?बर्ड फ्लू हा आजार प्रामुख्यांमध्ये आढळतो, मात्र आता या आजाराची विषाणूने मानवाच्या शरीरात प्रवेश केला आहे. या व्यक्तीला या गंभीर आजाराची लागण कशी झाली याचा शोध घेतला असता असे आढळले की, या व्यक्तीच्या अंगणात कोंबड्या आणि इतर पाळीव पक्षी आहेत. यातील दोन पक्ष्यांचा अलिकडेच मृत्यू झाला होता. तसेच हा व्यक्ती अशी ठिकाणी वास्तव्यास आहे की या ठिकाणी सहजपणे जंगली पक्षी पोहोचू शकतात. त्यामुळे हे पाळीव प्राणी किंवा जंगली पक्ष्यांच्या संपर्कात आल्यामुळे या व्यक्तीला हा गंभीर आजार झाला आहे.
H5N5 विषाणूचा धोका किती?समोर आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत मानवाला या विषाणूची लागण झालेली नव्हती. तसेच हा विषाणू जास्त संसर्गजन्य नाही. त्यामुळे या रोगाच्या संसर्गाचा धोका खूप कमी आहे. मात्र काही तज्ज्ञांनी असंही म्हटलं आहे की या विषाणूमध्ये काही अणुवांशिक बदल झालेले असावेत, त्यामुळे मानवाला लागण झाली असावी.
H5N1 आणि H5N5 मधील फरक काय आहे?H5N1 या विषाणूची लागण अमेरिकेतील जंगली पक्षी, पाळीव कोंबड्या, गायी आणि काही मानवांना झालेली आहे. या दोन्ही विषाणूतील फरक म्हणजे विषाणूच्या पृष्ठभागावर असलेली प्रथिने आहेत. 2024 पासून युनायटेड स्टेट्समध्ये H5 बर्ड फ्लूची लागण झालेले 51 मानवी रुग्ण आढळले होते. या लोकांना सौम्य त्रास झाला. मात्र या वर्षी जानेवारीमध्ये लुईझियानामध्ये या आजारामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे.