मानवी वस्तीत बिबट्याचा उपद्रव वाढल्याने जीवितहानी होत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत, तर दुसरीकडे शहरी भागात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. प्राणी, निसर्ग आणि मानवी वस्ती यांच्यातील योग्य समतोल साधण्यासाठी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे.
रवींद्र कदम, विकासनगर, देहूरस्ता