ज्याला भारताचा गर्व आहे, अभिमान आहे, तो (व्यक्ती) हिंदू आहे, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केलं आहे. हिंदू धर्म केवळ धार्मिक नव्हे तर तो एक सभ्यतावादी आहे, अशा शब्दांत भागवत यांनी हिंदू धर्माचे वर्णन केलं. भारत आणि हिंदू हे एकच आहेत, ते समानार्थी शब्द आहेत. मोहन भागवत यांनी भारताचे वर्णन मूळतः “हिंदू राष्ट्र” असे केले. तसेच आरएसएसचे चारित्र्य निर्माण आणि एकतेच्या ध्येयावर त्यांनी भर दिला.
गुवाहाटी येथील एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. भारताला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्याची गरज नाही, त्याच्या संस्कृतीतून ते आधीच प्रतिबिंबित होतं, असं ते म्हणाले. हिंदू हा केवळ एक धार्मिक शब्द नाही तर एक सभ्य ओळख आहे, जी हजारो वर्षांच्या सांस्कृतिक परंपरेशी जोडलेली आहे असेही मोहन भागव यांनी नमूद केलं.
भारताला जागतिक नेता बनवण्यासाठी संघाची स्थापना
“भारत आणि हिंदू हे समानार्थी शब्द आहेत. भारताला ‘हिंदू राष्ट्र‘ म्हणून घोषित करण्यासाठी कोणत्याही अधिकृत घोषणेची आवश्यकता नाही. त्याच्या सभ्य स्वरूपातून ते आधीच प्रतिबिंबित होतं .” असं ते म्हणाले. संघाची स्थापना कोणाचाही विरोध करण्यासाठी किंवा त्याला हानी पोहोचवण्यासाठी नाही, तर चारित्र्य निर्माणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि भारताला जागतिक नेता बनवण्यासाठी योगदान देण्यासाठी झाली आहे असंही मोहन भागवत यांनी सांगितलं. विविधतेतून भारताला एकजूट करणं यालाच , याच पद्धतीली आरएसएस असं म्हटलं जातं.
घुसखोरीवर व्यक्त केली चिंता
आसाममधील लोकसंख्याशास्त्रीय बदलांवरील चिंता दूर करण्यासाठी आत्मविश्वास, दक्षता आणि स्वतःच्या भूमी आणि ओळखीबद्दल दृढ आसक्ती बाळगण्याचे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी यावेळी केले. अवैध घुसखोरी, हिंदूंसाठी तीन अपत्यांचा आदर्श समाविष्ट करून संतुलित लोकसंख्या धोरणाची गरज आणि फुटीर धर्मांतरांना विरोध करण्याचे महत्त्व यासारख्या मुद्द्यांवरही मोहन भागवत यांनी भाष्य केलं. आत्मविश्वास, दक्षता आणि आपल्या भूमी आणि संस्कृतीशी आपण दृढ आसक्ती राखली पाहिजे असे ते म्हणाले. समाजातील सर्व घटकांनी निःस्वार्थपणे एकत्र काम केले पाहिजे असेही मोहन भागवनत यांनी नमूद केलं.