Motivational speaker: प्रेरणादायी वक्ते म्हणून राज्यभर ज्यांची ख्याती असलेले वसंत हंकारे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हंकारे केवळ मुलींनाच रडवतात, मुलांना रडवू शकत नाहीत.. अशी टीका त्यांच्यावर होत होती. एकाने तर हजार रुपयांचं चॅलेंजही लावलं होतं. पण त्यांनी आता मुलांना रडवल्याचा व्हिडीओ शेअर केलाय.
वसंत हंकारे हे तरुण मुला-मुलींना व्यक्तिमत्व विकासाच्या माध्यमातून संस्कार देण्याचं काम करतात. विशेषतः मुलींनी प्रेमविवाह करुन घरातून निघून जाऊ नये, यावर ते बोलत असतात. मुलींनी आपल्या वडिलांचा संघर्ष आठवावा, चांगलं शिकावं, मोठं व्हावं.. आणि संस्कारी आयुष्य जगावं, असं त्यांचं म्हणणं असतं. त्यांच्या निवेदनामध्ये ते भावनिक आवाहन करताना हृदयस्पर्शी शब्द वापरतात. त्यामुळे उपस्थितांच्या डोळे पाणवतात.
Nashik Goda Park : गोदाकाठी उत्साहाचे वातावरण! १७ कोटींचा 'गोदा पार्क' नाशिककरांसाठी अखेर खुला; पर्यटकांची गर्दीसोशल मीडियात वसंत हंकारे यांना सातत्याने ट्रोल केलं जातं. ते फक्त मुलींनाच रडवतात, मुलांना रडवू शकत नाहीत.. अशीही टीका नेटकरी करतात. एका पठ्ठ्याने तर त्यांना चॅलेंज दिलं होतं. हंकारे यांनी मुलांना रडवून दाखवावं आणि हजार रुपये घ्यावेत, असं ते चॅलेंज होतं. मात्र मुलंही रडतात, हे आता त्यांनी दाखवून दिलं.
वसंत हंकारे यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तरुण मुलं आणि मुलींचे वडील रडताना दिसतात. हंकारे यांनी ही पोस्ट करत म्हटलं, आपले हजार रुपये आपल्याकडेच ठेवा.. मी काम करत रहातो, तुम्ही ट्रोल करत राहा.. असं त्यांनी म्हटलंय. शिवाय आपण व्यसनमुक्तीचं काम असंच सुरु ठेवणार असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं.
Kannad Politics : जिल्हाप्रमुखपदावरून डावलल्याने भरतसिंग राजपूतांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र! वसंत हंकारे यांची पोस्टमुलांना रडवून दाखव.. तुला हजार रुपये देतो.. असं कोणीतरी सोशल मीडियावरती म्हणत आहे. बंधू आपले हजार रुपये आपल्यासाठी ठेवा. आपण ट्रोल करत रहा, मी काम करत राहतो. माझ्या राष्ट्राची लेकरं व्यसनमुक्त होणारच. माझ्या राष्ट्राच्या लेकी खोट्या प्रेमाच्या जाळ्यात कधीच फसणार नाहीत, तू लाव किती पण ताकद... मी तयार आहे. अशी ही पोस्ट आहे. तर त्यासोबत व्हिडीओ जोडला आहे.
View this post on Instagram