पुणे : शहरात पुन्हा अवैध धंद्यांचे जाळे सक्रिय होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. मटका, प्रतिबंधित गुटखा तसेच ‘एमडी’सारख्या घातक अमली पदार्थांचा पुरवठा वाढत असून, पोलिसांनी अलीकडे केलेल्या कारवायांत ही बाब समोर आली आहे. फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत सुमारे १२ लाख रुपये किमतीचे मेफेड्रॉन (एमडी) जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे, या भागात अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल दोन पोलिस कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली असून, विभागीय चौकशी करण्यात येत आहे.
गुन्हे शाखेने छापा टाकून आरोपी शरणप्पा कट्टीमनी याच्या ताब्यातून ५९ ग्रॅम ‘एमडी’ जप्त करण्यात आले. या घटनेवरून शहराच्या मध्यवस्तीत पुन्हा अमली पदार्थांचे ‘नेटवर्क’ सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी वारंवार कठोर सूचना दिल्या असतानाही मटका आणि ड्रग्ज विक्री सुरू असल्याचे समोर आले आहे. शहरातील वाढत्या मटका जुगार अड्ड्यांवरही पोलिसांनी अलीकडे मोठी मोहीम राबवली. मटका रॅकेटशी संबंधित नंदकुमार नाईकला एमपीडीए (महाराष्ट्र प्रतिबंधक कारवाई) कायद्यान्वये एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले.
Nashik Crime : नाशिकमध्ये एमडीचा अड्डा! पुणे महामार्गावरील हॉटेलमध्ये छापा, सेवानिवृत्त पोलिसाच्या मुलासह तिघे गजाआडदरम्यान, आयपीएल सीझनदरम्यान वाढलेल्या ऑनलाइन क्रिकेट बेटिंगच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एकाचवेळी छापे टाकण्यात आले. या कारवायांमध्ये लॅपटॉप, मोबाईल आणि सट्टेबाजीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
हुक्का पार्लरमध्ये वाढ
शहरातील अनेक भागांत प्रतिबंधित गुटखा खुलेपणाने विकला जात आहे. त्यामागे खास ‘नेटवर्क’ सक्रिय असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर काही हॉटेलमध्ये बेकायदा हुक्का पार्लरही चालविली जात असल्याचे समोर आले आहे. अशा ठिकाणांवर कारवाई करण्याची गरज आहे.