'इंडियाज गॉट टॅलेंट'चं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या पर्वात अनेक स्पर्धेत आपल्यातलं टॅलेंट दाखवत आहे. या शोमध्ये नवज्योत सिंग सिद्धू, सिंगर शान आणि मलायका अरोरा हे परिक्षक म्हणून आहेत. सध्या त्याचा शोमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो व्हिडिओ पाहून सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. या शोमध्ये चक्क मलायका आरोराने तिचं हटके टॅलेंट चाहत्यांना दाखवलं आहे.
सोनी टीव्हीच्या ऑफिशिअर सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला. या व्हिडिओमध्ये सिद्धू पाजी मलायकाकडे इलायची चहाची मागणी करतात. त्यावर मलायका त्यांना म्हणते की, 'नाम है मलायका तो इस चाय को जरा मलायका मारके देती हू' असं म्हणत तिने स्टेजवर तिचं टॅलेंट दाखवून दिते.
या व्हिडिओमध्ये मलायका स्पर्धकाच्या डोक्यावर गॅस ठेवून चहा बनवताना पहायला मिळतेय. या स्पर्धकाच्या डोक्यावर काचेचा ग्लास तसंच त्यावर गॅस ठेवण्यात आला. त्यानंतर मलायकाने पातेलं ठेवत त्यावर 'मलायका मारके' चहा बनवला. हा व्हिडिओ पाहून उपस्थितीसह परिक्षक सुद्धा चकित झाले. मलायकाचा हा हटके अंदाज पाहून चाहत्यांना सुद्धा धक्का बसला आहे.
View this post on Instagram
सध्या सोशल मीडियावर मलायकाचा 'इंडियाज गॉट टॅलेंट' मधील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय. 4 ऑक्टोंबर रोजी इंडियाज गॉट टॅलेंट हा शो सुरु झाला आहे. दर शनिवार आणि रविवारी रात्री 9.30 मिनिटांनी हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येतो.
'हे तर ISISसारखं…' धुरंधर ट्रेलरवर ध्रुव राठींचा रोष, प्रेक्षकही थक्क, फक्त हिंसा, खुन-खराबा आणि टॉर्चर