वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीमध्ये बेछूट गोळीबार आणि तलवारीने सपासप वार करण्यात आले. ज्यामध्ये काँग्रेस युवा नेत्याचा मृत्यू झाला आहे तर, दोन जण गंभीर जखमी आहे… याप्रकरणी पोलीस तपास करत असून, सीटीटीव्ही फुटेज देखील तपासत आहे… लाल सिंगी येथील एका हॉटेलबाहेर वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान दोन गटांमध्ये गोळीबार आणि तलवारीने वार करण्यात आले. यामध्ये संतोषगड येथील युवा काँग्रेस नेते आशु पुरी यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर दुसऱ्या गटातील लोकांवर धारदार शस्त्रांनी हल्ला झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, युवक काँग्रेसचे माजी ब्लॉक अध्यक्ष गुरजीत सिंग मान आणि त्यांचे दोन सहकारी परमिंदर सिंग आणि पुरजिंदर सिंग यांच्यावर या हत्येचा आरोप आहे.
पोलिसांनी मृत आशु पुरीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तांडा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवला आहे. संशयित तिघांव्यतिरिक्त पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. परविंदर सिंगने त्याच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केल्याची माहिती देखील समोर येत आहे.
पोलिसांना दिलेल्या तक्रारीत, बहदला येथील रहिवासी आकाशने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री लाल सिंगी येथील एका हॉटेलमध्ये वाढदिवसाची पार्टी आयोजित करण्यात आली होती, जिथे पुरजिंदर सिंगचा वाढदिवसही साजरा करण्यात आला होता. पार्टी दरम्यान, दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला. हा वाद हॉटेलच्या बाहेर आला आणि दोन्ही गटांमध्ये हाणामारी देखली झाली.
आकाश याने केलेल्या आरोपांनुसार, गुरजीत सिंगने परमिंदर सिंगला आशु पुरी यांच्यावर गोळीबार करण्यास प्रवृत्त केलं, त्यानंतर आशु पुरी यांच्या डोक्यात गोळी झाडली. डोक्यात गोळी लागल्यामुळे आशु पुरी यांचं जागीच निधन झालं. गोळीच्या जखमांमुळे रक्तस्त्राव झालेले आशु आणि दुसऱ्या गटातील पुरजिंदर आणि परमिंदर यांना ताबडतोब उना येथील प्रादेशिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे आशु पुरी यांना मृत घोषित करण्यात आलं.
पोलिस अधीक्षक अमित यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबाराच्या घटनेप्रकरणी तीन जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
आशू पुरी यांना लागल्या 4 गोळ्याघटना घडल्यनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटूज तपास आहे. ज्यामध्ये आतापर्यंत असं समोर आलं आहे की, संतोषगडच्या तरुण काँग्रेस नेत्याला एक नाही तर त्याहून अधिक गोळ्या लागल्या आहेत. काँग्रेस युवा नेत्याला दोन गोळ्या डोक्यात आणि दोन गोळ्या गळ्या शेजारी मारल्या आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार गोळ्यांबद्दल स्पष्ट माहिती मिळेल.