IND A vs BAN A : भारताचा उपांत्य फेरीत फिल्डिंगचा निर्णय, बांगलादेशला किती धावांवर रोखणार?
GH News November 21, 2025 06:11 PM

एसीसी मेन्स आशिया कप एमर्जिंग रायजिंग स्टार्स स्पर्धेत उपांत्य फेरीचा थरार रंगणार आहे. उपांत्य फेरीतील दोन्ही सामने आज 21 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहेत. दुसर्‍या सामन्यात श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. तर पहिल्या सामन्यात भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात अंतिम फेरीसाठी चुरस आहे.भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार जितेश शर्मा याने नाणेफेक जिंकून बांगलादेशला बॅटिंगसाठी भाग पाडलंय.

बांगलादेश ए प्लेइंग ईलेव्हन : हबीबुर रहमान सोहन, जिशान आलम, झवाद अब्रार, अकबर अली (कॅप्टन आणि विकेटकीपर), महिदुल इस्लाम अंकन, यासिर अली, एसएम मेहेरोब, अबू हैदर रोनी, रकीबुल हसन, अब्दुल गफ्फार सकलेन आणि रिपन मंडोल.

इंडिया ए प्लेइंग ईलेव्हन : प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, नमन धीर, नेहल वढेरा, जितेश शर्मा (कॅप्टन आणि विकेटकीपर), हर्ष दुबे, आशुतोष शर्मा, रमणदीप सिंग, विजयकुमार वैशाख, गुरजपनीत सिंग आणि सुयश शर्मा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.