सानिया मिर्झा मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे तूफान चर्चेत आहे. सानियाने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याच्यासोबत लग्न केले. मात्र, लग्नाच्या अवघ्या काही वर्षांमध्येच त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सानिया आणि शोएब यांच्या घटस्फोटाची कोणतीही चर्चा रंगताना दिसली नाही. शोएबने थेट त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केली आणि एकच खळबळ उडाली. सानिया मिर्झाला सोडून शोएबने थेट पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत लग्न केले. सोशल मीडियावर ज्याप्रकारे सानिया पोस्ट शेअर करत होती, त्यावरून तिची दु:ख स्पष्ट दिसत होते. हेच नाही तर शोएब मलिकच्या अफेअरला सानिया वैतागली होती आणि त्यामुळेच तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. मात्र, शोएब आणि सना जावेदच्या लग्नाबद्दल तिला काहीच कल्पना नव्हती.
घटस्फोटाच्या काही महिन्यानंतर आता सानिया मिर्झा तिच्या घटस्फोटाबद्दल भाष्य करताना दिसतंय. घटस्फोट होण्याच्या अगोदर काय काय घडत होते हे सांगताना सानिया दिसलीये. हेच नाही तर घटस्फोटानंतर आयुष्य कसे बदलले हे देखील सानिया मिर्झाने सांगितले आहे. शोएबसोबत घटस्फोट झाल्यानंतर सानिया मिर्झा परत भारतात येणार असल्याची चर्चा होती. मात्र, सानिया आपल्या मुलासोबत दुबईतच राहते. कामानिमित्त ती भारतात येते.
फराह खानसोबत बोलताना सानियाने मोठा खुलासा केला. ज्यावेळी सानिया मिर्झाला फराह खानने बघितले त्यावेळी ती नेमक्या कोणत्या स्थितीमध्ये होती, हे देखील फराह खानने सांगितले. एपिसोड दरम्यान, सानियाने खुलासा केला की तो काळ असा होता जेव्हा ती खूप कठीण काळातून जात होती. ती म्हणाली, मुळात म्हणजे हे मी कॅमेऱ्यासमोर सांगू इच्छित नाही, पण तो माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळांपैकी एक होता.
ज्यावेळी तू माझ्या सेटवर आली होती, त्यावेळी मी कोणत्या अवस्थेत होते आणि मला लाईव्ह शोला जायचे होते. जर तू आली नसती तर कदाचित मी ते करू शकले नसते. त्या दिवशी मी थरथर कापत होते आणि तू मला म्हणाली, काहीही झाले तरी तुला हा शो करावाच लागेल…फराहनेही तो दिवस आठवला आणि ती म्हणाली की सानियाला इतकी अस्वस्थ पाहून मी देखील घाबरली होती. तिला तिच्या शूटला जायचे होते, पण ती लगेच सर्व काही सोडून नाईट कपड्यांवर आणि चप्पल घालून तिच्याकडे गेली. कारण त्यावेळी सानिया जवळच्या मित्राची गरज होती.