भाजपनं पिंपरी चिंचवडमध्ये जाळं फेकलं
अजित पवार गटातील १० बडे नेते गळाला लागणार?
भाजप नेत्याच्या दाव्यानं खळबळ
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय. महायुती आणि महाआघाडीतील नेत्यांनी चांगलीच कंबर कसली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महायुतीत सर्व काही अलबेल नसल्याचं चित्र आहे. महायुतीतील भाजप, अजित पवार गट आणि शिंदेंची शिवसेना हे मित्र पक्षातील नेत्यांना आणि प्रमुखांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचं चित्र आहे. यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडला असल्याचं बोललं जात आहे. अशातच पुण्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटातील काही नेत्यांनी भाजप पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. यामुळे राजकीय वातावरण अधिक तापलं आहे.
उपमुख्यमंत्रीएकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीत त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी आपली नाराजी उघडपणे दिल्ली दरबारी मांडली. भाजपचा बडा नेता शिवसेनेतील नेते फोडत असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून ऑपरेशन लोटस राबवले जात आहे. वरिष्ठ नेत्यांपासून माजी नगरसेवकांपर्यंत सर्वांना पक्षात सामील करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत.
एकच नंबर! लग्नसराईत सोनं- चांदीच्या दरात घसरण, १ तोळं सोन्याचा आजचा भाव किती?दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप पिंपरी चिंचवडमधीलराष्ट्रवादी अजित पवारगटातील जवळपास १० माजी नगरसेवकांना गळाला लावण्याच्या तयारीत आहे. जवळपास १० माजी नगरसेवकांसोबत चर्चा केली असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे पिंपरी चिंचवडमधील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
मंदिरात भेटायला बोलावलं, अपरहण करत हॉटेलवर नेलं; तरुणीवर गँगरेप करत....भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी सांगितलं की, महापालिकेत भाजपच्या विजयासाठी प्रयत्न सुरू आहेत. सक्षम उमेदवार उभे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटातील १० हून अधिक माजी नगरसेवकांसोबत चर्चा सुरूये. त्यांना भाजप पक्षात येण्याची इच्छा दर्शवली', असं काटे म्हणाले.
बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घराला भीषण आग; अभिनेता नेमका कुठे होता? आगीचा VIDEO समोर