Latest Marathi News Live Update : पुण्यात चुलत भावाकडूनच तरुणाची निर्घृण हत्या
esakal November 21, 2025 10:45 PM
Pune Live: पुण्यात चुलत भावाकडूनच तरुणाची निर्घृण हत्या

पुण्यातील गुजरवाडी येथील धक्कादायक घटना. हत्या करत चुलत भावाचा मृतदेह भरला पोत्यात. अजय पंडित असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव तर अशोक पंडित असं आरोपीचं नाव. आरोपीला पुणे पोलिसांनी पिंपरी चिंचवड येथून केली अटक. भावाची हत्या करत त्याचा मृतदेह पोत्यात भरून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या गुजरवाडी येथे फेकून दिला होता.

Mumbai Live: मुंब्रा रेल्वे अपघात, अटक टाळण्यासाठी अभियंत्यांची हायकोर्टात धाव

मुंब्रा अपघातामध्ये गुन्हा दाखल असलेल्या रेल्वेच्या अभियंत्यांनी अटक टाळण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली आहे. अटकपूर्वी जामीन अर्जावर 9 डिसेंबरला सुनावणी पार पडणार आहे. ठाणे सत्र न्यायालयाकडून यापूर्वीच दोघांचाही अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला होता.

अनेक वर्षांपासून रखडलेल्या नगर- मनमाड महामार्गाच्या कामाला सुरुवात

अनेक वर्षांपासून रखडलेल्या अहिल्यानगर येथील नगर- मनमाड महामार्गाच्या कामाला सुरुवात . खासदार निलेश लंके आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली कामाची पाहणी. पाहणी करतांना अधिकाऱ्यांना देखील दिल्या सूचना.

Kalyan Live: कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजपाला मोठा धक्का

कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजपाला मोठा धक्का मिळाला आहे. भाजपचे माजी नगरसेवक सुरेश भोईर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. निष्ठावंतांना डावलून आयात उमेदवारांना संधी मिळते असा भोईरांनी आरोप केला आहे.

Kolhapur Live: आजरा नगर पंचायतसाठी तिरंगी लढत

आजरा नगरपंचायतीच्या निवडणुकीत तिरंगी सामना होणार आहे. भाजपचे नेते अशोक चराटी यांच्या सत्ताधारी ताराराणी आघाडीच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी आणि आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती, जुना भाजप गट हे दोन गट निवडणुकीच्या मैदानात उतरतील. तसेच, अपक्ष उमेदवारही नगराध्यक्ष आणि काही प्रभागांमध्ये आपले नशीब आजमावतील. नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Baramati Live: बारामती नगरपरिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आठ जागा बिनविरोध

बारामती नगरपरिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या आठ जागा बिनविरोध

शहराध्यक्ष जय पाटील यांची माहिती

कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण फटाक्याची बाजी

Solapur Live: अनगर नगरपंचायत तांत्रिकदृष्ट्या बिनविरोध झाली

- अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी पात्र असलेल्या अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज अखेर मागे

- अनगर नगरपंचायत तांत्रिकदृष्ट्या बिनविरोध झाली

- अनगर मधील 17 नगरसेवक आणि नगराध्यक्ष अखेर बिनविरोध झाले

- राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या उमेदवार उज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर आरोप प्रत्यारोप झाले होते

- त्यानंतर आज अखेर अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी आज अर्ज मागे घेतला

- त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या अनगर नगरपरिषद बिनविरोध झालीय

- मात्र असं असलं तरी उज्वला थिटे यांनी न्यायालयात धाव घेतल्याने कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेय

Malegaon Live: डोंगराळे चिमुरडी हत्या प्रकरणानंतर मालेगावात तणाव वाढला

डोंगराळे चिमुरडी हत्या प्रकरणानंतर मालेगावात तणाव वाढला असून, आरोपीला आमच्या ताब्यात द्या नाहीतर आरोपीला तात्काळ एन्काऊंटर करा अशी मागणीसाठी नातेवाईकांसह ग्रामस्थांनी केली आहे. आक्रमक नातेवाईकांनी रस्त्यावर न्यायालयासमोरच मांडला ठिय्या

Mumbai Live: अंधेरीत एका घरातील टॉयलेटच्या फ्लश टँकमध्ये शेकडो मतदार ओळखपत्र सापडल्याने खळबळ

मुंबईच्या अंधेरी भागात एका घरातील टॉयलेटच्या फ्लश टँकमध्ये शेकडो मतदार ओळखपत्र सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही सर्व ओळखपत्र कोरी आहेत. ज्यावर मतदारांची फोटो जरी नसले तरी हे ओळखपत्र या शौचालयाच्या प्लस टॅंक मध्ये कशी आली यावरून आता सर्वत्र निवडणूक आयोगाच्या कारभाराविषयी शंका उपस्थित केली जात आहे. विरोधकांकडून वारंवार मतदार यादी घोळ याविषयी आवाज उचलला जात असताना आज हे मतदार कार्डाचे नमुने आढळून आल्यामुळे पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या कारभाराविषयी शंका उपस्थित केली जात आहे

Amravati Live: अमरावतीमध्ये कृषीमंत्री दत्ता भरणे यांच्या उपस्थितीमध्ये भव्य कृषी मेळावा

अमरावतीमध्ये कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भव्य कृषी मेळावा

यशोमती ठाकूर यांनी खोडके यांना एवढ्या शिव्या घातल्या आहे लोकांना माहित आहे.

आग लगी है तो धुवा निकलेगा आमदार संजय खोडके यांची यशोमती ठाकूर यांच्या वर टीका.

Sambhajinagar Live : मालेगावातील भीषण घटनेच्या निषेधार्थ पाचोडमध्ये आक्रोश मोर्चा!


तीन वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि निर्घृण हत्येमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे.

या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड येथे नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आक्रोश मोर्चा काढला.
चिमुकलीला न्याय मिळावा आणि आरोपीला तत्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी जोरदार मागणी मोर्चादरम्यान करण्यात आली.

घटनेविरोधात जनतेचा रोष वाढत असून न्यायासाठीचा आवाज आणखी तीव्र होत आहे.

Malegaon Live : मालेगावात अफवेमुळे गोंधळ! कोर्टात घुसण्याचा प्रयत्न, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली
  • आरोपीला कोर्टात आणल्याची अफवा पसरताच मोर्चातील जमाव अचानक आक्रमक झाला.

  • संतप्त जमावाने कोर्टात घुसण्याचा प्रयत्न केला.

  • पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

  • सध्या मालेगावात परिस्थिती पूर्णपणे शांत आहे.

Jalna Live : भोकरदन निवडणूक तापली! दानवे विरुद्ध देशमुख—प्रतिष्ठेची लढत कोण जिंकणार?

जालन्यातील भोकरदन नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजताच शहरातील राजकारण तापले आहे. भाजपचे आमदार संतोष दानवे, राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे माजी आमदार चंद्रकांत दानवे, आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख—या तिन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

मागील २० वर्षांपासून नगरपालिकेवर राजाभाऊ देशमुख यांचे एकहाती वर्चस्व असून, यंदाच्या निवडणुकीत ते हे वर्चस्व टिकवतात की दानवे बंधू सत्ता काबीज करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Gurugram LiveUpdate: २००२ च्या तरतुदींनुसार अंदाजे १०८ कोटी रुपये किमतीचा १.३५ एकरचा व्यावसायिक भूखंड तात्पुरता जप्त केला आहे- ईडी

वटिका लिमिटेडशी संबंधित बिल्डर-गुंतवणूकदार प्रकरणात, अंमलबजावणी संचालनालयाच्या गुरुग्राम क्षेत्रीय कार्यालयाने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), २००२ च्या तरतुदींनुसार अंदाजे १०८ कोटी रुपये किमतीचा १.३५ एकरचा व्यावसायिक भूखंड तात्पुरता जप्त केला आहे: ईडी

DharashivLive Update : साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर करावा, स्वाभिमानी शेतकरी आक्रमक

धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील चौकात स्वाभिमानी संघटनेचे रास्ता रोको आंदोलन झाले. साखर कारखान्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीर गाळप सुरू करून शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. साखर कारखान्यांनी ऊसाला पहिली उचल ३५०० रुपये द्यावी, तर गुळपावडर कारखान्यांनी किमान ३ हजार रुपये दर देण्याची मागणी करण्यात आली आहे. स्वाभिमानी संघटनेच्या आंदोलनामुळे ढोकी - लातूर - धाराशिव कळंब महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. ऊसदर जाहीर करावा, अन्यथा कारखान्यांचा गाळप बंद पाडण्याचा कार्यकर्त्यांचा थेट इशारा देण्यात आला आहे.

Liveupdate: मालेगावात आंदोलकांचा कोर्टात शिरण्याचा प्रयत्न

मालेगावात आंदोलकांचा कोर्टात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे.

Ahilyanagar Live : अहिल्यानगर जिल्ह्यातील पुणतांबा गावात पाणीटंचाईचा कळस! रागावलेल्या ग्रामस्थांचा मनसेसोबत मटकाफोड आंदोलन

अहिल्यानगर जिल्ह्यातील पुणतांबा गावात गेल्या पंचवीस दिवसापासून ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत लागतोय.. सत्ताधारी तसेच प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने मनसे आणि ग्रामस्थांनी पुणतांबा ग्रामपंचायत समोर मटकाफोड आंदोलन करत तीव्र संताप व्यक्त केलाय... लवकरात लवकर ग्रामस्थांना नियमित पिण्याचे पाणी दिले जावे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिलाय...

Datta Bharne: कृषिमंत्री दत्तामामा भरणे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर

कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमाला लावणार हजेरी...

कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने लावले अमरावती शहरामध्ये बॅनर..

बॅनर च्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी, सरकारची धोरणे, सरकारी आश्वासन यावर ओढले ताशेरे.

शेतकरी मरत आहे, सत्ता मजेत हेच का तुमचे विकासाचे मॉडेल?महायुती च्या धोरणानि उध्वस्त शेती,किमान आधारभाव हवा पक्का, महायुती सरकार करतंय फक्त ढोंग असे आशयाचे लागले बॅनर.

Pune Live : आंदेकर टोळीचे गुंड पोलिसांच्या ताब्यात; कृष्णा, अभिषेक आणि शिवराज आंदेकरची धिंड काढली

आंदेकर टोळीतील प्रमुख गुंड कृष्णा, अभिषेक आणि शिवराज आंदेकरची पोलिसांनी काढली धिंड

घरझडतीच्या निमित्ताने नाना पेठ, गणेश पेठेत फिरविले

पुण्यात आंदेकर टोळीने गेले काही महिन्यात शहरात धुमाकूळ घातला आहे

माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर बांदेकर टोळीने जवळपास तीन खून केले आहेत

आयुष कोमकर हत्या प्रकरणात सध्या ह्या आरोपी शिक्षा भोगत आहेत

किनवट नगरपालिका निवडणूकीत भाजप आणि ठाकरे सेनेत थेट लढत

नांदेडच्या किनवट नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि ठाकरे सेनेची थेट लढत होत आहे.

ठाकरे सेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि भाजपाचे आमदार भीमराव केराम यांच्यासाठी किनवट नगरपालिका निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

जिल्ह्याच्या ठिकाणापासून किनवट हे शहर जवळपास दीडशे किलोमीटर अंतरावर आहे. मागच्या वेळेस किनवट नगरपालिकेवर भाजपाची एक हाती सत्ता होती.

भाजपाच्या कार्यकाळात किनवट शहराचा विकास झाल्याचा दावा करण्यात आला.परंतु प्रशासक राज आल्याने किनवट शहराचा विकास खुंटला असा किनवटकरांचा आरोप आहे.

दरम्यान, भाजपाच्या कार्यकाळात किनवट शहरात कुठलाच विकास झाला नसून नगरपालिकेच्या अनेक कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काहींनी केला आहे.

मालेगावच्या डोंगराळे येथे लहान मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ नाशिकमध्ये मोर्चा

- मालेगावच्या डोंगराळे येथे लहान मुलीवर अत्याचार करून ठार करण्यात आल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये मोर्चा

- काळया फिती लाऊन मूक मोर्चा काढत करण्यात आला निषेध व्यक्त

- संशयित आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी मोर्चेकरांची मागणी

- अखिल भारतीय सोनार समाज यांनी एकत्र येऊन काढला मोर्चा

- सराफ बाजारापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलाय मोर्चा

- संशयित आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करणार मागणी

नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी आज उमेदवारांना माघारीची अखेरची मुदत

दोंडाईचा वरवाडे नगर परिषदेवर मंत्री जयकुमार रावल यांचा करिष्मा कायम

दोंडाईचा वरवाडे नगर परिषदेसाठी यापूर्वीच 9 उमेदवारांनी घेतली होती माघारी, आता दिवसाच्या सुरुवातीलाच आणखी दोन उमेदवारांनी माघारी घेतल्याने 26 पैकी 11 नगरसेवक भाजपचे झाले बिनविरोध

आज माघारीची शेवटची मुदत असताना मुदत संपेपर्यंत आणखी किती भाजपचे नगरसेवक बिनविरोध होणार आणि किती विरोधक माघारी घेणार हे बघणं ठरणार औचित्याच

मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री यांची नगराध्यक्ष म्हणून यापूर्वीच बिनविरोध निवड झाल्यानंतर मंत्री रावल यांनी संपूर्ण निवडणूक बिनविरोध करणार असे केले होते जाहीर, त्याप्रमाणे मंत्री जयकुमार रावल यांनी बोलून दाखवल्याप्रमाणे खरंच दोंडाईचा नगरपरिषद बिनविरोध होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून...

Buldhana News : विद्येचे धडे देणाऱ्या मुख्याध्यापकांचा शाळेत मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा

बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मोहना बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली.

मुख्याध्यापक कांबळे दारूच्या नशेत शाळेत दारू पिऊन आले आणि धिंगाणा घालायला लागले तेव्हा शाळेत सर्व विद्यार्थी आणि शिक्षक हजर होते, आणि प्रार्थना सुद्धा सुरू होती.

Hingoli live : हिंगोलीत तीन वाहनाचा भीषण अपघात

हिंगोली शहरात तीन वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. डंपर आणि खाजगी ट्रॅव्हल्स एकमेकांना धडकल्याने भीषण अपघात झाला. अपघातात कारमधील एक जण जखमी झाला आहे.

Amravati news : देवेंद्र फडवणीसांचे मामेभाऊ आल्हाद कलोतींची बिनविरोध निवड

चिखलदरा नगरपरिषदेत नगरसेवक पदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती बिनविरोध निवड...

फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोतींची पहिली प्रतिक्रिया

चिखलदरा विकासासाठी जनता फडणवीस यांच्यावर विश्वास.

विरोधकांनी सामूहिक निर्णय घेत फॉर्म मागे घेतले

West Bengal Live : कोळसा घोटाळ्याप्रकरणी ईडीची मोठी कारवाई: हावडा-दुर्गापूरमध्ये २४ ठिकाणी छापे

पश्चिम बंगालमध्ये, ईडी बेकायदेशीर कोळसा खाणकाम, बेकायदेशीर वाहतूक आणि साठवणुकीसंदर्भात दुर्गापूर, पुरुलिया, हावडा आणि कोलकाता जिल्ह्यातील २४ ठिकाणी छापे टाकत आहे. हे फोटो हावडा येथील एका व्यावसायिकाच्या घरावर टाकलेल्या छाप्यातील आहेत.

Thane Live : ठाण्यात एकनाथ शिंदेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण

ठाण्यातील शिवसेनेच्या हरीश महाडिक आणि महेश लहाने या दोन पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या माजी नगरसेवकाने मारहाण केल्याचे समोर आले आहे.

"Akola Crime : अर्धवट जळालेल्या युवतीचा मृतदेह आढळला शेतात

बाळापूर (जि. अकोला) : धनेगाव येथील शेतशिवारात अर्धवट जळालेल्या अवस्थेतील अनोळखी युवतीचा विवस्त्र मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिस, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक तसेच ठसेतज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले आहेत. तुरीच्या शेतात गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

Anil Ambani : बॅंक कर्ज घोटाळा प्रकरणात उद्योगपती अनिल अंबानींची आणखी संपत्ती जप्त

नवी दिल्ली : बॅंक कर्ज घोटाळा प्रकरणात गंभीर आरोप झालेल्या उद्योगपती अनिल अंबानी यांची आणखी एक हजार ४०० कोटी रुपयांची संपत्ती सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. याआधी ‘ईडी’ने अंबानी यांची साडेसात हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. हवाला प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींनुसार अंबानी यांच्या संपत्तीवर टाच आणण्याची मोहीम सुरू आहे.

Malegaon Girl Case : तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार प्रकरणी आज मालेगाव बंद

मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ आज मालेगाव बंदची हाक देण्यात आलीये. तसेच दुपारी 11 वाजता आक्रोश मोर्चा काढत निषेध व्यक्त केला जाणार आहे. मालेगावच्या रामसेतू पूल ते अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा आक्रोश मोर्चा असेल.

Karnataka Politics : कर्नाटकात मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरकारची अडीच वर्षे पूर्ण

बंगळूर : कर्नाटकात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील ‘सत्तावाटप’ करारावरील मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सरकारला अडीच वर्षे पूर्ण होत असताना मंत्रिमंडळ फेरबदल आणि नेतृत्व बदलाच्या मागण्यांमुळे काँग्रेस हायकमांड द्विधा मन:स्थितीत आहे. सध्या तरी ‘यथास्थिती’ कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, संसद अधिवेशनानंतरच पुढील पाऊल उचलले जाईल, असे वरिष्ठ सूत्रांचे म्हणणे आहे.

Rahul Gandhi : सर्वोच्च न्यायालयाचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिलासा

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविरोधात लखनौच्या न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाने चार डिसेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे. २०२२ मध्ये ‘भारत जोडो’ यात्रेवेळी राहुल गांधी यांनी लष्कराच्या विरोधात आक्षेपार्ह टिपणी केली होती. यासंदर्भात उदय शंकर श्रीवास्तव नावाच्या व्यक्तीने गांधी यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने राहुल गांधी यांना समन्स बजावत सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. लखनौ न्यायालयाने बजावलेल्या समन्सला राहुल गांधी यांनी गत मे महिन्यात अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Municipal, Nagar Panchayat Elections : पालिका, नगरपंचायतीचे चित्र आज स्पष्ट होणार; अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस

कोल्हापूर, पन्हाळा : नगर परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज (ता. २१) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे माघारीनंतर निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी हे स्पष्ट होईल.

Tamhini Ghat Accident : ताम्हिणी घाटात मोटार कोसळून ६ तरुणांचा मृत्यू

Latest Marathi Live Updates 21 November 2025 : पुण्यातून कोकणात फिरण्यासाठी निघालेल्या तरुणांच्या मोटार ताम्हिणी घाटात रायगड हद्दीतील धोकादायक वळणावर सुमारे पाचशे फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात मोटारीतील सहाही तरुणांचा मृत्यू झाला. तसेच नगर परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज (ता. २१) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे माघारीनंतर निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी हे स्पष्ट होईल. संयुक्त जनता दलाचे(जेडीयू) प्रमुख नितीश कुमार यांनी गुरुवारी दहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविरोधात लखनौच्या न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाने चार डिसेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.