टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिका या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. उभयसंघातील दुसरा आणि अंतिम कसोटी सामना हा 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटीत होणार आहे. त्यानंतर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात एकदिवसीय आणि टी 20I मालिका खेळवण्यात येणार आहे. एकदिवसीय मालिकेत 3 सामने होणार आहेत. त्यानंतर टी 20I मालिकेत 5 सामने होणार आहेत. या दोन्ही मालिकांसाठी पाहुण्या दक्षिण आफ्रिकने संघ जाहीर केला आहे. दक्षिण आफ्रिकेने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
उभयसंघातील एकदिवसीय मालिकेचं आयोजन हे 30 नोव्हेंबर ते 6डिसेंबर दरम्यान करण्यात आलं आहे. टेम्बा बावुमा या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. त्यानंतर 9 ते 19 डिसेंबर दरम्यान टी 20i मालिकेतील 5 सामने खेळवण्यात येणार आहेत. टी 20i मालिकेसाठी एडन मार्करम याच्याकडे दक्षिण आफ्रिकेच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.
विस्फोटक फलंदाज डेव्हिड मिलर याचं टी 20i संघात कमबॅक झालं आहे. मिलरने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना हा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळला होता. तसेच अनुभवी विकेटकीपर फलंदाज क्विंटन डी कॉक याला दोन्ही मालिकांसाठी संधी देण्यात आली आहे.
पहिला सामना, 30 नोव्हेंबर, रांची
दुसरा सामना, 3 डिसेंबर, रायपूर
तिसरा सामना, 6 डिसेंबर, विशाखापट्टणम
पहिला सामना, 9 डिसेंबर, कटक
दुसरा सामना, 11 डिसेंबर, मुल्लानपूर
तिसरा सामना, 14 डिसेंबर, धर्मशाला
चौथा सामना, 17 डिसेंबर, लखनौ
पाचवा सामना, 19 डिसेंबर, अहमदाबाद
वनडे आणि टी 20i सीरिजसाठी दक्षिण आफ्रिका टीम
टीम इंडिया विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ : टेम्बा बावुमा (कॅप्टन), ओटनील बार्टमन, कॉर्बिन बॉश, मॅथ्यू ब्रीट्जके, डेवाल्ड ब्रेव्हीस, नांद्रे बर्गर, क्विंटन डी कॉक, टोनी डी जोर्जी, रुबीन हरमॅन, मार्को यान्सेन, केशव महाराज, लुंगी एन्गिडी, रियान रिकल्टन आणि प्रेनेलन सुब्रायन.
टीम इंडिया विरूद्धच्या टी 20I मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ : एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेव्हीस, क्विंटन डी कॉक, टोनी डी जोर्जी, डोनोवोन फरेरा, रीजा हेंड्रिक्स, मार्को यान्सेन, केशव महाराज, लुंगी एन्गिडी, ट्रिस्टन स्टब्स, एनरिक नॉर्खिया, डेविड मिलर, जॉर्ज लिंडे आण क्वेना मफाका.