रायझिंग स्टार्स आशिया कप 2025 स्पर्धेत इंडिया ए संघाचं पारडं जड होतं. टीम इंडियात तगडे स्टार खेळाडू असल्याने जेतेपदाचं स्वप्न पूर्ण होईल असं वाटलं. पण साखळी फेरीत पाकिस्तानकडून आणि उपांत्य फेरीत बांगलादेशकडून पराभूत होऊन मायदेशी परतावं लागणार आहे. टीम इंडियाने उपांत्य फेरी गाठली पण अंतिम फेरीत पोहोचून जेतेपद मिळण्याचं स्वप्न मात्र भंगलं. खरं तर उपांत्य फेरीत सर्व काही भारतीय संघाच्या बाजूने होतं. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी केली. तसेच विजयासाठी दिलेल्या 195 धावा सहज गाठेल अशी सुरुवातही झाली. पण 20 भारतीय संघ विजयासाठी दिलेल्या धावांची बरोबरी गाठू शकला आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये आयपीएलमध्ये स्टार फलंदाज फेल गेले. दोन चेंडूवर दोन विकेट पडल्या आणि हाती फक्त भोपळा आला. त्यामुळे पराभव होणार हे निश्चित झालं. त्यातही वाइड टाकला आणि सामना संपला. या पराभवासाठी पाच खेळाडू जबाबदार आहेत. कसं ते समजून घ्या
जितेश शर्मा : उपांत्य फेरीतील पराभवासाठी कर्णधार स्वत: जबाबदार आहे. त्याने महत्त्वाच्या सामन्यात 23 चेंडूत 33 धावा केल्या. पण अशावेळी बाद होऊन परतला जेव्हा त्याची मैदानात गरज होती. सुपर ओव्हरमध्येही खराब खेळला आणि पहिल्याच चेंडूवर क्लिन बोल्ड होत तंबूत परतला.
नमन धीर : फलंदाजी आणि गोलंदाजीत दोन्ही ठिकाणी फ्लॉप ठरला. 12 चेंडूत फक्त 7 धावा केल्या. तर गोलंदाजीत एकाच षटकात 28 धावा दिल्या. त्यामुळे विजयासाठी अतिरिक्त धावांचा बोजा पडला. झालंही तसंच एका धावेने पराभव निश्चित झाला.
विजयकुमार विशक : उपांत्य फेरीत बांगलादेशी फलंदाजांना तर विजयकुमार विशकची गोलंदाजी बोनस म्हणूनच मिळाली. विकेट तर दिली नाही. चार षटकात 51 धावा ठोकल्या. हा स्पेल भारताच्या पराभवाचं कारण ठरलं.
आशुतोष शर्मा : आयपीएलमध्ये आशुतोष शर्मा काही सामन्यात फिनिशरची भूमिका बजावताना दिसला आहे. पण उपांत्य फेरीत पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्याने 6 चेंडूत फक्त 13 धावा केल्या. सुपर ओव्हरमध्ये पहिली विकेट पडल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर विकेट टाकून आला.
रमणदीप सिंग : आयपीएल स्टार या खेळाडूनेही निराशा केली. उपांत्य फेरीत 11 चेंडूत 17 धावा करून बाद झाला. इतकंच काय तर गोलंदाजीत 2 षटकं टाकली आणि 29 धावा दिल्या.
नेहल वढेरा: आयपीएलमध्ये नेहल वढेराचा भाव आहे. लिलावात हे दिसून आलं आहे. पण उपांत्य फेरीत संथ गतीने खेळणं टीम इंडियाला महागात पडलं. त्याने 29 चेंडूंचा सामना करत फक्त 32 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट फक्त 110 चा होता.