मालेगावात घटनेच्या निषेधार्थ संभाजीनगरमधील पाचोडमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला
तीन वर्षीय चिमुकलीवर झालेल्या भयंकर अत्याचार आणि खुनाच्या घटनेने राज्यभर संताप उसळला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोडमध्ये आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते
निष्पाप चिमुकलीला न्याय मिळावा आणि आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
जनतेतही प्रचंड असंतोष व्यक्त होत असून न्यायासाठीचा संघर्ष अधिक तीव्र होत आहे.
Malegaon: आरोपीला कोर्टात आणलं, अशी अफवा पसरल्याने मोर्चातील जमाव झाला आक्रमकमालेगाव -
- आरोपीला कोर्टात आणलं, अशी अफवा पसरल्याने मोर्चातील जमाव आक्रमक झाला
- जमावाने कोर्टात शिरण्याचा प्रयत्न केला
- पोलिसांनी आता परिस्थिती नियंत्रणात आणलीय
- सध्या मालेगावात शांतता आहे
भोकरदन नगरपालिका निवडणुकीत संतोष दानवे, चंद्रकांत दानवे आणि राजाभाऊ देशमुख यांची प्रतिष्ठा पणालाजालन्यातील भोकरदन नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर भोकरदन शहरामध्ये राजकारण चांगलंच तापलंय.भाजपचे आमदार संतोष दानवे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांची निवडणुकीमध्ये प्रतिष्ठापणाला लागली आहे.मागील वीस वर्षापासून भोकरदन नगरपालिकेवरती काँग्रेसचे राजाभाऊ देशमुख यांचे एकहाती वर्चस्व राहिलेला आहे या निवडणुकीत राजाभाऊ देशमुख वर्चस्व कायम ठेवतात की दानवे बाजी मारतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.
Dharashiv: साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर करावा, स्वाभिमानी शेतकरी आक्रमकधाराशिव तालुक्यातील ढोकी येथील चौकात स्वाभिमानीचे रास्ता रोको आंदोलन
साखर कारखान्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीर गाळप सुरू करून शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा आरोप
साखर कारखान्यांनी ऊसाला पहीली उचल 3500 रुपये द्यावी तर गुळपावडर कारखान्यांनी किमान 3 हजार रुपये दर देण्याची मागणी
स्वाभिमानी संघटनेच्या आंदोलनामुळे ढोकी - लातुर - धाराशिव कळंब महामार्गावर वाहनांच्या लागल्या होत्या मोठ्या रांगा
उसदर जाहीर करावा अन्यथा कारखान्यांचा गाळप बंद पाडण्याचा कार्यकर्त्यांचा थेट इशारा
Byte:रविंद्र इंगळे,जिल्हाध्यक्ष,स्वाभिमानी शेतकरी संघटना
Anil Deshmukh: सलील देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर अनिल देशमुख यांच्या घरी जिल्ह्यातील नेत्यांची महत्त्वाची बैठक- सलील देशमुख यांच्या जाण्याने काय परिणाम होणार? यावर विचारमंथन
- सलील देशमुख यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु
- “सलील देशमुख यांचा राजीनामा वरिष्ठ स्तरावर नामंजूर करण्यात येणार असल्याचं सांगितलं जातं आहेय”
- “सलील देशमुख लवकरात परत येतील, त्यांची समजूत काढण्यात आम्हाला काही प्रमाणात यश आलंय
- सलील देशमुख अजीत पवारांकडे जाणार नाही असाही दावा जिल्हाध्यक्ष कुंटे पाटील यांनी केला...
- शरद पवारांच्या राष्ट्रवादी नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष प्रविण कुंटे पाटील यांचं वक्तव्य
Ahilyanagar: पुणतांबा ग्रामपंचायत समोर मटकाफोड आंदोलन -अहिल्यानगर जिल्ह्यातील पुणतांबा गावात गेल्या पंचवीस दिवसापासून ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत लागतोय.. सत्ताधारी तसेच प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने मनसे आणि ग्रामस्थांनी पुणतांबा ग्रामपंचायत समोर मटकाफोड आंदोलन करत तीव्र संताप व्यक्त केलाय... लवकरात लवकर ग्रामस्थांना नियमित पिण्याचे पाणी दिले जावे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिलाय...
Pune: मुंढवा जमीन प्रकरणाचे मूळ मालक पुणे पोलीस आयुक्तालयातमुंढवा जमीन प्रकरणाचे मूळ मालक पुणे पोलीस आयुक्तालयात
या मूळ मालकांचा पुणे पोलीस आज नोंदवणार जबाब
काल शितल तेजवानी यांचा जबाब घेतल्यानंतर आज या जमिनीच्या मूळ मालकांना पुणे पोलिसांनी जबाब नोंदणीसाठी बोलावलं
Datta Bharne: कृषिमंत्री दत्तामामा भरणे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर...कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमाला लावणार हजेरी...
कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने लावले अमरावती शहरामध्ये बॅनर..
बॅनर च्या माध्यमातून शेतकऱ्यांची कर्जमाफी, सरकारची धोरणे, सरकारी आश्वासन यावर ओढले ताशेरे.
शेतकरी मरत आहे, सत्ता मजेत हेच का तुमचे विकासाचे मॉडेल?महायुती च्या धोरणानि उध्वस्त शेती,किमान आधारभाव हवा पक्का, महायुती सरकार करतंय फक्त ढोंग असे आशयाचे लागले बॅनर.
Pune: पुण्यात आंदेकर टोळीची काढली धिंडआंदेकर टोळीतील प्रमुख गुंड कृष्णा, अभिषेक आणि शिवराज आंदेकरची पोलिसांनी काढली धिंड
घरझडतीच्या निमित्ताने नाना पेठ, गणेश पेठेत फिरविले
पुण्यात आंदेकर टोळीने गेले काही महिन्यात शहरात धुमाकूळ घातला आहे
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर बांदेकर टोळीने जवळपास तीन खून केले आहेत
आयुष कोमकर हत्या प्रकरणात सध्या ह्या आरोपी शिक्षा भोगत आहेत
BJP: किनवट नगरपालिका निवडणूकीत भाजप आणि ठाकरे सेनेत थेट लढत.नांदेडच्या किनवट नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि ठाकरे सेनेची थेट लढत होत आहे. ठाकरे सेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि भाजपाचे आमदार भीमराव केराम यांच्यासाठी किनवट नगरपालिका निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. जिल्ह्याच्या ठिकाणापासून किनवट हे शहर जवळपास दीडशे किलोमीटर अंतरावर आहे. मागच्या वेळेस किनवट नगरपालिकेवर भाजपाची एक हाती सत्ता होती. भाजपाच्या कार्यकाळात किनवट शहराचा विकास झाल्याचा दावा करण्यात आला.परंतु प्रशासक राज आल्याने किनवट शहराचा विकास खुंटला असा किनवटकरांचा आरोप आहे. दरम्यान भाजपाच्या कार्यकाळात किनवट शहरात कुठलाच विकास झाला नसून नगरपालिकेच्या अनेक कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काहींनी केला आहे.
Kopargaon: कोपरगावमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध भाजप सामनाकोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी असा थेट सामना होतोय.. या निवडणुकीत काळे आणि कोल्हे या पारंपारिक राजकीय विरोधक असलेल्या राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.. राष्ट्रवादीने राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ काका कोयटे यांना नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरवले असून असून आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली जात आहे.. आमचा उमेदवार शंभर टक्के निवडून येणार असून समोरच्यांच्या पायाखालची वाळू सरकणार आहे असा विश्वास आमदार काळे यांनी व्यक्त केलाय..
मालेगावच्या डोंगराळे येथे लहान मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ नाशिकमध्ये मोर्चा- मालेगावच्या डोंगराळे येथे लहान मुलीवर अत्याचार करून ठार करण्यात आल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये मोर्चा
- काळया फिती लाऊन मूक मोर्चा काढत करण्यात आला निषेध व्यक्त
- संशयित आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी मोर्चेकरांची मागणी
- अखिल भारतीय सोनार समाज यांनी एकत्र येऊन काढला मोर्चा
- सराफ बाजारापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलाय मोर्चा
- संशयित आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करणार मागणी
Local Bodies Election: नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी आज उमेदवारांना माघारीची अखेरची मुदतदोंडाईचा वरवाडे नगर परिषदेवर मंत्री जयकुमार रावल यांचा करिष्मा कायम
दोंडाईचा वरवाडे नगर परिषदेसाठी यापूर्वीच 9 उमेदवारांनी घेतली होती माघारी, आता दिवसाच्या सुरुवातीलाच आणखी दोन उमेदवारांनी माघारी घेतल्याने 26 पैकी 11 नगरसेवक भाजपचे झाले बिनविरोध
आज माघारीची शेवटची मुदत असताना मुदत संपेपर्यंत आणखी किती भाजपचे नगरसेवक बिनविरोध होणार आणि किती विरोधक माघारी घेणार हे बघणं ठरणार औचित्याच
मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री यांची नगराध्यक्ष म्हणून यापूर्वीच बिनविरोध निवड झाल्यानंतर मंत्री रावल यांनी संपूर्ण निवडणूक बिनविरोध करणार असे केले होते जाहीर, त्याप्रमाणे मंत्री जयकुमार रावल यांनी बोलून दाखवल्याप्रमाणे खरंच दोंडाईचा नगरपरिषद बिनविरोध होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून...
Kagal: कागल मध्ये ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात 85 वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीला मारहाणशंकर गणपती निर्मळे यांना मारहाण
शेतीच्या वादातून भाऊबंधांनीच केली मारहाण
8 एकर शेतीचा वाद
पुरुषांसह महिलांनी अमानुष मारहाण केल्याचा आरोप
मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज वायरल
कागल पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल
Hingoli: हिंगोलीत तीन वाहनाचा भीषण अपघातहिंगोली शहरात तीन वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. डंपर आणि खाजगी ट्रॅव्हल्स एकमेकांना धडकल्याने भीषण अपघात झाला. अपघातात कारमधील एक जण जखमी झाला आहे.
देवेंद्र फडवणीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोतींची बिनविरोध निवडचिखलदरा नगरपरिषदेत नगरसेवक पदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती बिनविरोध निवड...
फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कलोतींची पहिली प्रतिक्रिया
चिखलदरा विकासासाठी जनता फडणवीस यांच्यावर विश्वास.
विरोधकांनी सामूहिक निर्णय घेत फॉर्म मागे घेतले
भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी दोन उमेदवारांना एबी फॉर्म,आज एकाचा पत्ता कट होणारहिंगोलीच्या वसमत नगरपरिषदेत भारतीय जनता पक्षाने चक्क नगराध्यक्ष पदाच्या दोन उमेदवारांना एबी फॉर्म चे वाटप केल्याने गोंधळ उडाला आहे, सविता मारुती क्यातमवार व सुषमा शिवदास बोडेवार यांनी नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून एबी फॉर्म लावत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत दरम्यान आज उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने दोन उमेदवारांपैकी नेमका कोणाचा पत्ता करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहेत तर दुसरीकडे वसमत नगर परिषदेमध्ये आमदार चंद्रकांत नवघरे यांनी खेळी करत शिवसेनेला उमेदवार मिळू दिला नसल्याने वसमत पालिकेत राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे तर महाविकास आघाडीने मात्र एकत्र येत काँग्रेस कडून सीमा अब्दुल हाफिज यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
माणगाव निजामपूर मार्गावर अज्ञात गाडीने पाठीमागून धडक दिल्याने व्हॅगनार कार थेट कालव्यात कोसळलीमाणगाव निजामपूर मार्गावर रात्री माणगावकडे येत असतात व्हॅगनार कारला क्रांती नगर परिसरात अपघात झाला आहे. हि वॅगन कार रस्ता लगत असलेल्या काळव्यात कोसळली आहे. या अपघातात चालक जखमी झाला असून त्याच्यावर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अज्ञात गाडी ने पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
डॉक्टरांना खंडणी मागितल्याने सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल ,तीन आरोपी अटकलातूर शहरातील गायत्री हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरला 50 हजाराची खंडणी मागणाऱ्या आरोपींनी विरोधात लातूरच्या एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, दरम्यान खंडणी मागणाऱ्यांपैकी तीन आरोपी हे सध्या एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात आहेत , यात एका महिलेसह इतर दोघांचा सहभाग आहे. भागवत मडके अभिषेक गिरी आणि राधिका पाटील उर्फ नगीता खरोसे यांना अटक करण्यात आली आहे . रुग्णालयातील कर्मचारी यांच्या पगार देण्याच्या कारणावरून या आरोपींनी वाद घातला आणि डॉक्टरांकडून मारहाण करत पैशाची मागणी केली अशी तक्रार डॉक्टर भराटे यांनी एमआयडीसी पोलिसांना दिली आहे . तर या तक्रारीवरून एकूण सात जणांवरती खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपी महिला पोलिसांना आरेरावी करत उद्धट बोलतानाचा व्हिडिओ द सध्या तुफान वायरल होतो आहे
निफाड परिसरात थंडीची लाट! गोई नदीवरील बंधाऱ्यातून पाण्याची वाफ, विहंगम दृश्य कॅमेराबद्धनिफाड तालुक्यात सध्या थंडीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे, ज्यामुळे जनजीवनावर परिणाम होत आहे. विशेषतः गोळेगाव, गोंदेगाव, मरळगोई, दहेगाव आणि वाहेगाव या परिसरांत थंडीची तीव्रता जास्त जाणवत आहे. या वाढलेल्या थंडीमुळे येथील गोई नदीवरील बंधाऱ्यातील पाण्याची वाफ होत असल्याचं एक अद्भूत आणि विहंगम दृश्य पाहायला मिळत आहे. सकाळच्या वेळी नदीच्या पृष्ठभागावरून धुक्याप्रमाणे पाण्याची वाफ वर जाताना दिसत आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसर एका सुंदर निसर्गरम दृश्याने न्हाऊन गेला आहे. या विहंगम दृश्याची नोंद छायाचित्रकार पंडित मुदगुल यांनी घेतली आहे. त्यांनी आपल्या ड्रोनच्या साह्याने हे दुर्मिळ दृश्य चित्रित केले असून, या परिसरातील वाढलेल्या थंडीचा आणि निसर्गाच्या चमत्काराचा अनुभव कॅमेऱ्यात कैद केला आहे.
इंद्रायणी पाठोपाठ पवना नदी देखील फेसाळलीपवना नदी पात्रात रसायन मिश्रित पाणी तसेच मैला मिश्रित सांड पाणी थेट सोडल्याने पवना नदी मोठ्या प्रमाणात फेसाळली आहे. चिंचवड येथील केजुबाई बंधाऱ्यावर पवना नदी पात्रात पांढरा फेस मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. त्यामुळे पवना नदी पात्रातील जलचर जीवन आणि पिंपरी चिंचवड करांचा आरोग्य देखील धोक्यात आल आहे. पिंपरी चिंचवडकर पवना नदी पात्रातून वाहत येणारा पाणी पीत असतात, त्यामुळे एकूणच त्यांचे आरोग्य देखील धोक्यात आल आहे. पवना नदी पात्रात रसायन मिश्रित आणि मैला मिश्रित सांड पाणी सोडणाऱ्या उद्योगधंद्यावर महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने तात्काळ कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता पर्यावरण प्रेमी करत आहेत.
पवना धरण परिसरातील आठ बंगले जमीनदोस्त, जलसंपदा विभागाची मोठी कारवाई...पवना धरण परिसरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम जलसंपदा विभागामार्फत सुरू असून परिसरातील आठ बंगले जमीनदोस्त करण्यात आले आहेत. धरण क्षेत्रातील सुरक्षा आणि जलस्तोत्राचे संरक्षण लक्षात घेऊन ही मोहीम करण्यात आली आहे. धरण क्षेत्रातील अतिक्रमणामुळे जलसाठा पाण्याची शुद्धता आणि आपत्ती व्यवस्थापन यावर धोका निर्माण होत असल्याने जलसंपदा विभागाने कठोर पावले उचलली आहे. धरण परिसरातील अतिक्रमण हटविण्याचे या मोहिमेमुळे स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तर जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार पुढील काही दिवसातही ही मोहीम सुरूच राहणार असून उर्वरित अतिक्रमण लवकरच हटवली जाणार आहे..... दरम्यान या अतिक्रमण कारवाई विरोधाला पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता..
अमरावती जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत 29 हजार 106 महिला संकटाततांत्रिक तपासणीत अपात्र ठरल्याने महिलांचे दीड हजार रुपये बंद.
बालविकास विभागाने अपात्र ठरलेल्या महिलांची नावे जाहीर केली.
आर्थिक स्तर, आरोग्य, पोषण यांसह विविध कारणांनी पात्रता नाकारली
बँक खात्यातील व्यवहार व जोडलेली कागदपत्रे तफावत दाखवताहेत
जिल्ह्यात तब्बल ९ हजार महिलांच्या कागदपत्रांची तपासनी सुरूच.
31 डिसेंबरपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे प्रशासनाचे निर्देश.
कोल्हापूर महापालिका क्षेत्रात ३२ हजार दुबार मतदारकोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या २० प्रभागांच्या प्रारुप मतदार यादीत ३२ हजार २५० मतदारांची नावे दुबार असल्याची बाब समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगानेच मतदार यादीत दुबार असलेल्या नावांपुढे 'स्टार' चिन्ह टाकून याद्या दिल्या आहेत. महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयाकडील सहायक आयुक्त व उपशहर अभियंता प्रारुप मतदार याद्यांवर प्राप्त होणाऱ्या हरकतींवर सुनावणी घेणार आहेत, तशी दुबार मतदारांच्या नावांची खात्री करून घेतील. एकाच नावाचे दोन, कुठे तीन तर कुठे चार नावे आहेत. हे मतदार वेगवेगळे आहेत की एकच आहे याची शहनिशा केल्यानंतर त्यांची यादी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येणार आहे.
निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना तसेच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रारुप मतदार याद्या प्रति पान दोन रुपये प्रमाणे उपलब्ध करुन दिल्या जातील. त्यावर मतदारांची छायाचित्रे असतील, तर वेबसाईटवर जी यादी प्रसिद्ध केली गेली आहे ती मतदारांच्या छायाचित्रासह आहे. त्यामुळे दुबार मतदाराच्या नावावर उमेदवार किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना हरकती घेण्याची मुभा दिली आहे. त्यांना मतदान करायला द्यायचे की नाही याबाबतचे मार्गदर्शन मिळाल्यानंतर कार्यवाही केली जाईल, असे सांगण्यात आले
बाळासाहेब थोरातांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा पंजा गायबविधानसभा निवडणुकीनंतर संगमनेरमधील राजकीय गणिते बदलली असून पालिका निवडणुकीत काँग्रेसचे पंजा चिन्ह गायब झाले आहे.. संगमनेर हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला मानला जायचा मात्र संगमनेरमध्येच पंजा चिन्ह गायब झालंय.. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात आणि आमदार सत्यजीत तांबे यांच्या पुढाकाराने स्थानिक आघाडी बनवून पालिका निवडणूक लढवली जात आहे.. भाजप महायुतीला शह देण्यासाठी एकाच चिन्हावर निवडणूक लढवली जावी असा उद्देश असल्याची सारवासारव बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.. तर तुम्ही स्वतःला काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून मिरवता मात्र पालिका निवडणुकीत पंजा चिन्ह गायब होणे हा थोरातांचा पराभव आहे.. बाळासाहेब थोरात यांच्या राजकीय अंताला सुरुवात झाली असल्याचा टोला विधानसभेत थोरातांचा पराभव करणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांनी लगावला आहे...
सलील देशमुख तडकाफडकी मुंबईलासलील देशमुख यांची मध्यंतरी प्रकृती खराब असताना रुग्णालयात अजितदादा पवार यांनी स्वतःहून त्यांची भेट घेतली होती. त्यामुळे आता प्रकृतीचे कारण देत मुंबईला गेलेले सलील देशमुख हे अजित दादा पवार यांना भेटणार तर नाही ना अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
चिमुरडीवर अत्याचार प्रकरणी आज मालेगाव बंद- मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज मालेगाव बंदची हाक देण्यात आली आहे. तसंच दुपारी 11 वाजता आक्रोश मोर्चा काढत करणार निषेध व्यक्त केला जाणार आहे. मालेगावच्या रामसेतू पुल ते अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत हा आक्रोश मोर्चा असेल. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव मध्ये अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात असेल...
जालना शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर,जालना शहर महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे त्यानुसार जालना शहरामध्ये 2 लाख 45 हजार 913 मतदार असल्याच समोर आल आहे. तर जालना शहरातील प्रभाग क्रमांक पाच मध्ये सर्वाधिक कमी मतदार असून प्रभाग क्रमांक दहा मध्ये सर्वाधिक मतदार असल्याच देखील समोर आल आहे.दरम्यान 27 नोव्हेंबरपर्यंत हरकती नोंदविता येणार असून हकरतींवर सुनावणी झाल्यानंतर पाच डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.
धाराशिवमध्ये निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्काधाराशिवमध्ये ऐन नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खिंडार पडले आहे.माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला सोबतच जिल्हा समन्वयक दिनेश बंडगर यांच्या सह उबाठा शिक्षकसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ही भाजपमध्ये प्रवेश केला.उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का बसला असून हे प्रवेश म्हणजे घर वापसी असल्याचं राणाजगजीतसिंह पाटील यांनी म्हटलंय.
मतदानापूर्वीच रायगडात सहा उमेदवार बिनविरोधनगर पालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वीच रायगडच्या तीन नगरपालिकांमध्ये नगर सेवक पदाचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. अलिबागमध्ये शेकापचे प्रशांत नाईक बिनविरोध निवडून आले आहेत तर पेणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वसुधा पाटील यांच्या विरोधात अर्जच न आल्याने त्या विजयी झाल्या आहेत. पेणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची युती झाली असून त्यांनी एकमेकांविरोधातील उमेदवार मागे घेतले. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक गुरव आणि सुशीला ठाकूर हे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. तर प्रभाग क्रमांक 12 मधून भाजपाचे अभिराज कडू बिनविरोध विजयी झालेत. शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराने माघार घेतल्यामुळे रोह्यात राष्ट्रवादत काँग्रेसचे राजेंद्र जैन बिनविरोध निवडून आलेत.
गेल्या आठ वर्षात नागपूर शहरात वाढले 3 लाख 89 हजार नवे मतदार- गेल्या आठ वर्षात नागपूर शहरात वाढले 3 लाख 89 हजार नवे मतदार, महापालिकेची प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर
- मनपा निवडणुकीसाठी गुरुवारी प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली
- त्यानुसार नागपूर शहरातील मतदारांची संख्या 24 लाख 82 हजार 475 एवढी झाली आहे
- 2017 मध्ये नागपूर शहरात 20 लाख 93 हजार 392 मतदार होते
- पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे
- या वाढलेल्या मतदारांचा कल कोणाच्या बाजूने राहणार यावर मनपा निवडणुकीचा कौल राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे
KHED | राजगुरुनगर नगरपरिषद निवडणुकीत शिंदे गटाची पहिली बाजीअतुल देशमुखांनी नुकताच शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसेना पुर्ण ताकदीने राजगुरुनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरली असुन भाजप,राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार, शिवसेना उबाठा,आणि शिंदे गटाची शिवसेना असे चारही पक्षांची चौरंगी लढत होत असतानाही अतुल देशमुख यांनी मोठा डावपेच टाकत विचारावर चालणारी लोक कमी आहेत पण जी विचारावर चालतात ती घडतात असं म्हणत राजगुरुनगर नगरपरिषदेची पहिली जागा बिनविरोध करण्यात यश मिळाले यावेळी आनंदोत्सवातही भावना क्षण अनुभवायला मिळाला
MAVAL | मावळात दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितस्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मावळात अनेक ट्विस्ट बघायला मिळत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट दोन्ही पक्ष एकत्रित येऊन निवडणुकीला सामोरे जात आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाने अजित पवार गटाला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्हाला शरद पवार गटाने पाठिंबा दिल्यामुळे आमची ताकद मोठ्या प्रमाणात लोणावळा आणि वडगाव मध्ये वाढणार आहे असे मत आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केले.
SANGOLA | सांगोल्यात आजोबा आणि नातू एकाच वेळी रिंगणात,मारुती आबा बनकर हे भाजपचे सर्वात ज्येष्ठ उमेदवार असून त्यांनी यापूर्वी दोन वेळेला सांगोल्याचे नगराध्यक्ष पद भूषवले आहे. मारुती आबा बनकर यांनी नगराध्यक्षपदाची उमेदवारी दाखल करताना त्यांचा नातू ज्योतिरादित्य बनकर यांनी प्रभाग क्रमांक पाच मधून नगरसेवक पदासाठी उमेदवारी दाखल केली आहे. विशेष म्हणजे मारुती आबा बनकर हे सर्वात जास्त वयाचे उमेदवार असून त्यांचा नातू ज्योतिरादित्य हा सर्वात कमी वयाचा उमेदवार आहे. आता सांगोला नगरपालिका निवडणुकीत 73 वर्षांचे आजोबा मारुती आबा बनकर नगराध्यक्षपदासाठी तर त्यांचा 21 वर्षाचा नातू ज्योतिरादित्य हा नगरसेवक पदासाठी रिंगणात आहे.