घटस्फोट वाईट होता, संजय कपूर नाही…, करिष्माच्या खासगी आयुष्याबद्दल मोठं सत्य समोर
Tv9 Marathi November 21, 2025 11:45 PM

Karisma Kapoor : दिवंगत उद्योजक संजय कपूर याची बहीण मंधिरा कपूर हिने नुकताच एका मुलाखतीत धक्कादायक खुलासे केले आहेत. मंधिरा कपूर हिने स्पष्ट केलं की, संजय याने पूर्व पत्नी आणि अभिनेत्री करिश्मा कपूर हिचे कधीच हाल केले नाहीत. मंधीराने करिश्मा आणि संजयच्या नात्याबद्दल तसेच करिश्मा आणि प्रिया सचदेव ज्या मालमत्तेच्या वादात अडकले आहेत त्याबद्दल मोठे खुलासे केले आहेत. या वादात तिने करिश्माला पाठिंबा दिला.

संजय कपूर याने कधीच करिश्मासोबत वाईट केलं नाही – मंधिरा

एका पॉडकास्टमध्ये मंदिरा म्हणाली, ‘सोशल मीडियावर माझ्या भावाबद्दल नकारात्मक गोष्टी बोलल्या जात आहे… लोक म्हणत आहेत की, तो महिलांना वाईट वागणूक देत होता… सर्वात आधी तर तो आता आमच्याच नाही. त्यामुळे आपल्याला त्याचा सन्मान करायला हवा… प्रिया हिला सोडलं तर सर्वांना माहिती होतं की, संजय माणूस म्हणून कसा होता… करिश्मा आणि संजय यांच्यामध्ये 2003 – 2016 पर्यंत वैवाहिक संबंध राहिले. पण त्यामध्ये माझ्या भावाने कधीच करिश्माला त्रास दिला नाही…’

सांगायचं झालं तर, करिश्मा हिचा घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्रीवर घरगुती हिंसाचार झाला आहे.. असं अनेकदा सांगण्यात आलं. नवरा आणि सासूने करिश्माला वाईट वागणूक दिली.. असं देखील सांगितलं जातं. यावर मंधिरा म्हणाली, ‘त्यांचा घटस्फोट वाईट होता. पण अनेक घटस्फोट असेच असतात… खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवत कोणाला बदनाम करु नका…’

संजयच्या वारशाच्या मुद्द्यावर मंदिराने स्पष्टपणे सांगितलं की, करिश्मा कपूरची मुलं समायरा आणि कियान हेच ​​संजयच्या संपत्तीचे वारस आहेत. ‘माझ्या वडिलांनी संपूर्ण आयुष्य कुटुंबासाठी काम केलं. प्रिया हिच्यासाठी नाही… त्यांना प्रिया आवडत देखीन नव्हती…जर प्रिया वाटतं की, ती सर्वकाही हिरावून घेऊ शकते… तर त्याचा मी शेवटपर्यंत विरोध करेल…’

करिश्मासोबत मी वाईट केलं – मंधिरा

मंधीरा कपूरनं कबूल केलं की तिने तिच्या वडिलांना संजयच्या तिसऱ्या लग्नाला मान्यता देण्यासाठी राजी केलं होतं आणि आता तिला वाटतं की कदाचित करिश्मासोबत चुकीचं केलं असेल. ‘आम्हाला आतापर्यंत रडण्यासाठी देखील वेळ मिळालेली नाही. पूर्ण वेळ कोर्ट आणि आईची काळजी घेण्यात गेला… भावाच्या मृत्यूचं दुःख जाणवतं तेव्हा तो खूप खोल धक्का असतो’

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.