“ससुराल सिमर का” मालिकेमधून छोटा पडदा गाजवणारी आणि लाखो घरातील रसिकांच्या, प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी सिमर अर्थात दीपिका कक्कर इब्राहिम ही सध्या आयुष्यातील अतिशय कठीण टप्प्यातून जात आहे. ती लिव्हर कॅन्सरशी झुंड देतअसून काही महिन्यांपासून तिची ट्रीटमेंट सुरू आहे. त्या आधी एक सर्जरी करून तिच्या लिव्हरमधून मोठा ट्यूमरही काढून टाकण्यात आला होता. सध्या दीपिकावर उपचार सुरू आहेत आणि ती वेळोवेळी तिचे हेल्थ अपडेट हे चाहत्यांसोबत अपडेट्स शेअर करते. तिच्या लेटेस्ट व्हीलॉगमध्ये, दीपिका कक्करने खुलासा केला की तिचे उपचार सुरू आहेत आणि ती बरी होत आहे. पण या प्रवासात काही वेळा असे क्षण येतात की मी हरते, मोडून पडते, असं ती प्रांजळपणे कबूलही केलं.
दीपिका ही चाहत्यांसमोर तिच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी ओळखली जाते. कॅन्सरच्या उपचारांच्या दुष्परिणामांमुळे कधीकधी थकून जाते आणि रडायला लागते, असंही तिने सांगितलं. ” माझ्या मनात सतत भीती असते. असं नव्हे की मला सतत निराश वाटतं, काही दिवस खरेच खूप चांगले असतात, मी खुश असते,आशावादी असते.एखाद्या दिवशी मला वाटतं की सगळं काही ठीक, एवढा मोठा आजार होऊनही परिस्थिती ठीक आहे. प्रत्येक दिवस काही नवं घेऊन येत असतो आणि चालत राहणं, पुढे जाणं हाच एकमेव पर्याय आहे. आम्ही तेच करण्याचा प्रयत्न करत आहोत”, अशा शब्दांत दीपिकाने तिच्या भावना मांडल्या.
दीपिकाने दिले हेल्थ अपडेट
पुढे ती म्हणाली, “सध्या मी इमोशनल रोलर-कोस्टर राईडमधून जात्ये. देवाच्या कृपेने माझे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत आणि योग्य दिशेने प्रगती होत आहे. पण असं असलं तरीही माझ्या मनात एक भीती सतत आहे. सगळं काही ठीक असलं तरीही चिंता सतावत राहते. मी याबद्दल सोमनाथ सरांशी बोलले आणि त्यांनी चिंता कशी कार्य करते हे स्पष्ट केले. डॉ. इम्रान शेखही तेच म्हणतात” असं तिने नमूद केलं.
रोजच्या समस्यांनी त्रस्त दीपिका
लिव्हर कॅन्सरशी झुंज देत असलेली दीपिका कक्कर म्हणाली, की तिला दररोज एका नवीन समस्येने जाग येते. “मी दररोज एका नवीन समस्येचा सामना करते. कधीकधी माझ्या थायरॉईडच्या पातळीत चढ-उतार होतात. हार्मोनल बदलांचा शरीरावर अनपेक्षित परिणाम होतो. माझी त्वचा खूप कोरडी झाली आहे आणि गेल्या दोन दिवसांपासून हवा इतकी कोरडी आहे की माझ्या हातांच्या त्वचेला भेगा पडू लागल्या आहेत. मला माझ्या कानात आणि मानेवर एक विचित्र दाब जाणवतो. माझे नाकही खूप कोरडं वाटते” असं दीपीकाने तिच्या व्लॉगमध्ये सांगितलं. चाहत्यांना तिच्या तब्येतीची चिंता सतावत असून तिला बरं वाटावं यासाठी ते शुभेच्छा देत असतात .