मोठी बातमी! मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या, कुटुंबियांचा गंभीर आरोप, थेट…
GH News November 23, 2025 12:10 PM

एक अत्यंत खळबळजनक बातमी पुढे येतंय. राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केली. काल रात्री ही आत्महत्या केल्याची माहिती मिळतंय. आता मुलीचे घरचे वरळी पोलिस ठाण्यात पोहोचले असून ही आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा दावा त्यांच्याकडून केली जातंय. आमच्या मुलीने आत्महत्या केली नाही तर तिची हत्या करण्यात आलीये… असा दावा कुटुंबियांनी पोलिसांसमोर केला. सध्या पोलिसांकडून या प्रकरणात तपास केला जातोय. अनंत गर्जे मागील काही वर्षांपासून मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए म्हणून काम करतो. पंकजा मुंडे यांच्यासोबत तो कायमच दिसतो. काही महिन्यांपूर्वीच अनंत गर्जेचे लग्न झाल्याची माहिती मिळत आहे.

अनंत गर्जे याच्या लग्नाला स्वत: पंकजा मुंडे पोहोचल्या होत्या. लग्नाच्या अवघ्या काही दिवसात पत्नीने आत्महत्या करून जीवन संपल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी मुलीचे शव ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. कुटुंबिय मोठ्या संख्येने वरळी पोलिस ठाण्यात पोहोचले असून गंभीर आरोप करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणातील प्राथमिक तपास सुरू केला असून शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला. 

शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर नक्की काय घडले हे स्पष्ट होईल. याबाबत अजून मंत्री पंकजा मुंडे यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. पंकजा मुंडे नेमके काय बोलतात याकडे सर्वांच्या नजरा आहेत. पंकजा मुंडे यांचा पीए म्हणून अनंत गर्जे मागील काही वर्षांपासून काम करतो. मात्र, या आत्महत्येनंतर आता विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.